प्रभासच्या साहोसाठी श्रद्धा कपूरला मिळाले 7 कोटी ?, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 06:00 IST2019-08-26T06:00:00+5:302019-08-26T06:00:00+5:30

प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या जोडीच्या साहो सिनेमाच्या रिलीजची वाट फॅन्स मोठ्या आतुरतेने पाहत आहेत.  

Shraddha kapoor really got seven crores from saaho | प्रभासच्या साहोसाठी श्रद्धा कपूरला मिळाले 7 कोटी ?, वाचा सविस्तर

प्रभासच्या साहोसाठी श्रद्धा कपूरला मिळाले 7 कोटी ?, वाचा सविस्तर

प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या जोडीच्या साहो सिनेमाच्या रिलीजची वाट फॅन्स मोठ्या आतुरतेने पाहत आहेत.  साहोकडे 2019 मधला सर्वात बिग बजेट सिनेमा म्हणून पाहिलं जातंय. या सिनेमात काम करण्यासाठी  प्रभास आणि श्रद्धा कपूरने भलीमोठी रक्कम आकारल्याची चर्चा आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार श्रद्धा कपूरला या सिनेमासाठी 7 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. 


रिपोर्टनुसार श्रद्धाला यासिनेमासाठी केवळ 3 कोटींची ऑफर देण्यात आली आहे. तिच्या मानधनाला घेऊन पीआर टीमकडून अशा प्रकारच्या बातम्या केवळ प्रसिद्धीसाठी पसरवण्यात आल्या. ज्यामुळे टॉलीवूडमध्ये तिला जास्त मानधन दिल्याचे भासवून  बॉलिवूडमध्ये तिची फिस वाढवता येईल. साहोचे मेकर्स कतरिना कैफ केलेली 5 कोटींची ऑफर अफोर्ड न करु शकल्यांनी त्यांनी तिला सिनेमात नाही घेतले.  


प्रभासचे यात दमदार अॅक्शन सीन्स बघायला मिळणार आहेत. एक अॅक्शन शूट करण्यासाठी जवळपास 70 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. प्रभास त्याच्या या सिनेमासाठी चांगलीच मेहनत घेतली आहे. सिनेमाचे दिग्दर्शक सुजीत ही प्रत्येक अ‍ॅक्शन सीनकडे बारकाईने लक्ष दिले आहे. प्रत्येक सीनमध्ये प्रभास अतिशय प्रभावशाली दिसला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत.साहो हा सिनेमा भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये हा शूट केला गेला आहे. 


साहोने रिलीज आधीच 320 कोटींची कमाई केली आहे. रिपोर्टनुसार मेकर्सनी साहोचे थियेट्रिकल राईट्स 320 कोटींना विकले आहेत. मेकर्सनी साहोचे सेटलाईट राईट्स विकलेले नाहीत.  बाहुबलीनंतर साहो हा प्रभासचा पहिला सिनेमा आहे. त्यामुळे त्याचे फॅन्स या सिनेमाची वाट मोठ्या आतुरतेने पाहतायेत.   

Web Title: Shraddha kapoor really got seven crores from saaho