​‘हसीना’च्या प्रमोशनसाठी श्रद्धा कपूरने ठेवली सलमानसारखी अट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2017 11:41 IST2017-06-19T06:11:02+5:302017-06-19T11:41:57+5:30

सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ लवकरच रिलीज होतोय. सलमान खान सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. पण ‘ट्यूबलाईट’च्या प्रमोशनपूर्वी सलमानने मेकर्ससमोर ...

Shraddha Kapoor kept the condition of Salman Khan for the promotion of 'Hasina' | ​‘हसीना’च्या प्रमोशनसाठी श्रद्धा कपूरने ठेवली सलमानसारखी अट !

​‘हसीना’च्या प्रमोशनसाठी श्रद्धा कपूरने ठेवली सलमानसारखी अट !

मान खानचा ‘ट्यूबलाईट’ लवकरच रिलीज होतोय. सलमान खान सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. पण ‘ट्यूबलाईट’च्या प्रमोशनपूर्वी सलमानने मेकर्ससमोर एक अट ठेवली होती. कुठली माहितीयं? ‘ट्यूबलाईट’च्या प्रत्येक प्रमोशनमध्ये भाऊ सोहेल खान माझ्यासोबत असेल,अशी ही अट होती. सोहेल खानची ‘ट्यूबलाईट’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोहेलच्या या भूमिकेला आणखी ‘वजन’ मिळवून देण्यासाठी सलमानने ही अट ठेवली होती. आता कदाचित श्रद्धा कपूरनेही सलमानच्याच मार्गाने चालण्याचा निर्णय घेतला आहे.


होय, अलीकडे श्रद्धाने ‘हसीना’ या चित्रपटाचा टीजर रिलीज केला. हा चित्रपटत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद अब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्या आयुष्यावर आधारित आहे. या टिजरची सर्वांत खास बात म्हणजे, श्रद्धाचा लूक आणि तिचे एक्सप्रेशन्स. हा चित्रपट श्रद्धाच्या आयुष्यातील टर्निंग पॉर्इंग ठरावा, असे हे टीजर पाहिल्यानंतर वाटते आहे. निश्चितपणे हा चित्रपट श्रद्धासाठी खास आहे. यात श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूर हाही दिसणार असल्याने तो आणखीच खास झालाय. सिद्धांत यात दाऊद इब्राहिमची भूमिका साकारतो आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनपूर्वी श्रद्धाने सलमानसारखीच अट ठेवली आहे. प्रमोशन करेल तर भावासोबतच करेल, असे तिने म्हटले आहे. खरे तर, श्रद्धाची अशी अट साहजिकचही आहे म्हणायची. कारण सिद्धांतचा हा पहिला डेब्यू सिनेमा आणि महत्त्वाचे म्हणजे, त्याच्या पहिल्याच डेब्यू सिनेमात बहीण लीड रोलमध्ये आहे. आता अशात सिद्धांतला प्रकाशझोतात आणण्याची जबाबदारी श्रद्धाचीच झाली ना? या चित्रपटाच्या निमित्ताने भावाला नवी ओळख देण्याचा विचार श्रद्धाच्या मनात आला असेल तर त्यात काहीही वाईट नाही.
एकंदर काय तर, ‘हसीना’च्या प्रत्येक प्रमोशनमध्ये श्रद्धा व सिद्धांत एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान श्रद्धाने सिद्धांतला बºयाच टीप्स दिल्यात. तासन तास् त्याच्यासोबत सेटवर रिहर्सल केली. आता त्याचे काही तर फळ मिळायला हवे ना?

Web Title: Shraddha Kapoor kept the condition of Salman Khan for the promotion of 'Hasina'