'क्रिश ४' सिनेमातून श्रद्धा कपूर बाहेर, कोणती अभिनेत्री घेणार प्रियंकाची जागा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 17:29 IST2024-08-21T17:10:54+5:302024-08-21T17:29:28+5:30

ज्येष्ठ दिग्दर्शक राकेश रोशन यांचा 'कोई मिल गया' हा सायन्स- फिक्शन चित्रपट २१ वर्षांपूर्वी  प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Shraddha Kapoor is NOT the leading lady of Hrithik Roshans Krrish 4? which actress will replace Priyanka | 'क्रिश ४' सिनेमातून श्रद्धा कपूर बाहेर, कोणती अभिनेत्री घेणार प्रियंकाची जागा?

'क्रिश ४' सिनेमातून श्रद्धा कपूर बाहेर, कोणती अभिनेत्री घेणार प्रियंकाची जागा?

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) याने 'सुपरहीरो' बनून सर्वांचे मन जिंकले आहे. त्याची 'क्रिश' सीरीज चाहत्यांना खूपच आवडली. आता चाहते हे 'क्रिश ४' ची वाट पाहात आहेत. 'क्रिश ४' मध्ये हृतिकसोबत कोणती अभिनेत्री झळकणार याची उत्स्कुता चाहत्यांना आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही 'क्रिश ४' मध्ये पाहायला मिळणार असल्याचं बोललं जात होतं. आता याबाबत एक अपडेट समोर आलं आहे. 

'कोई मिल गया' मध्ये ऋतिकची नायिका ही प्रीती झिंटा होती. तर 'क्रिश' आणि 'क्रिश ३' मध्ये ऋतिकची जोडी प्रियंका चोप्रासोबत जुळली होती.  तर 'क्रिश ४'मध्ये ऋतिकसोबत श्रद्धा कपूर दिसणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली, पण तूर्तास तरी असे काही निश्चित नसल्याची माहिती बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार मिळाली आहे. 


प्रॉडक्शन टीमच्या जवळच्या एका सूत्राने स्पष्ट केले की, "चित्रपटाबद्दलच्या सर्व कास्टिंग अफवा खोट्या आहेत. आम्ही अद्याप कास्टिंगची प्रक्रिया सुरू केलेली नाही". त्यामुळे 'क्रिश ४'मध्ये ऋतिकची नायिका बनणार तरी कोण? हा प्रश्न चाहत्यांना सतावतोय. मागील काही दिवसांपासून 'क्रिश'च्या टीमने जोर लावला असून सध्या 'क्रिश ४'च्या पटकथेला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू असल्याचं समोर आलं आहे. 

ज्येष्ठ दिग्दर्शक राकेश रोशन यांचा 'कोई मिल गया' हा सायन्स- फिक्शन चित्रपट २१ वर्षांपूर्वी  प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. २००६ मध्ये 'क्रिश'च्या माध्यमातून या चित्रपटाचा पुढचा भाग आला. सात वर्षांनी २०१३ मध्ये 'क्रिश ३' प्रदर्शित झाला. हा चित्रपट येऊन ११ वर्षे लोटली तरी 'क्रिश ४'ची प्रतीक्षा संपलेली नाही. 

Web Title: Shraddha Kapoor is NOT the leading lady of Hrithik Roshans Krrish 4? which actress will replace Priyanka