श्रद्धा कपूरच्या तब्येतीत होतेय सुधारणा, शूटिंगला लवकरच करणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 11:15 IST2018-10-08T11:06:44+5:302018-10-08T11:15:33+5:30

श्रद्धा कपूरचा काही दिवसांपूर्वीच आलेल्या 'स्त्री' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. त्यानंतर श्रद्धा सायना नेहवालच्या बायोपिकच्या तयारीला लागली.

Shraddha Kapoor is in good health, shooting will start soon | श्रद्धा कपूरच्या तब्येतीत होतेय सुधारणा, शूटिंगला लवकरच करणार सुरुवात

श्रद्धा कपूरच्या तब्येतीत होतेय सुधारणा, शूटिंगला लवकरच करणार सुरुवात

ठळक मुद्देसायना नेहवाल बायोपिकसाठी श्रद्धा कपूरने महिनाभर मेहनत केली आहेश्रद्धाला डेंग्यू निदान झाल्याने तिने शूटिंग अर्धवट सोडले आहे

श्रद्धा कपूरचा काही दिवसांपूर्वीच आलेल्या 'स्त्री' सिनेमाने  बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. त्यानंतर श्रद्धा सायना नेहवालच्या बायोपिकच्या तयारीला लागली. मात्र श्रद्धाने या सिनेमाची शूटिंग अर्धवट सोडली होती कारण शूटिंग दरम्यान तिला डेंग्यू झाल्याचे निदान झाले.  

 श्रद्धाने इन्स्टाग्रामच्या स्टोरीज वर लिहिलेय, मित्रानो काळजी नका करु, मी आता बरी होतेय. तुम्हा सगळ्यांना खूप सारे प्रेम. त्यामुळे श्रद्धा आता पुन्हा शूटिंगला लवकरच सुरुवात करेल अशी शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच या बायोपिकचे फर्स्ट पोस्टर रिलीज करण्यात आले होते.  हे पोस्टर प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करणार आहेत व निर्मिती भूषण कुमार यांची आहे. सायना नेहवाल बायोपिकसाठी श्रद्धा कपूरने महिनाभर खूप मेहनत केली आहे. सकाळी सहा वाजता ती बॅडमिंटनचे ट्रेनिंग घेत होती. 

सायना नेहवाल बायोपिकसाठी श्रद्धा कपूरने महिनाभर खूप मेहनत केली आहे. सकाळी सहा वाजता ती बॅडमिंटनचे ट्रेनिंग घेत होती. याबाबत श्रद्धाने सांगितले होते की, या बायोपिकसाठी मी बॅडमिंटनचे चाळीस क्लासेस अटेंड केले आहेत. स्पोर्ट्स खूप कठीण आहे, पण मी खूप एन्जॉय केले. खेळाडूंची जीवनशैली आकर्षक असते. सायनाचा जीवनप्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. या प्रवासादरम्यान तिला झालेल्या दुखापतीपासून तिने जिंकलेल्या किताबापर्यंतचा तिचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. मी तिच्या जीवन प्रवासाशी रिलेट करू शकले कारण मला माझ्या क्षेत्रात तसाच अनुभव आला आहे. ती तिच्या ध्येयाबाबत खूप फोकस आहे आणि तिचा जीवनप्रवास खूप प्रेरणादायी आहे. 
 

Web Title: Shraddha Kapoor is in good health, shooting will start soon