शूटिंग-प्रमोशनमध्ये परीची धावपळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 18:53 IST2016-11-29T18:53:31+5:302016-11-29T18:53:31+5:30

परिणीती चोप्रा ही सध्या बॉलिवूडच्या सर्वांत बिझी अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाचे शूटिंग संपले नाही की लगेचच ...

Shot-promotion in the race! | शूटिंग-प्रमोशनमध्ये परीची धावपळ!

शूटिंग-प्रमोशनमध्ये परीची धावपळ!

िणीती चोप्रा ही सध्या बॉलिवूडच्या सर्वांत बिझी अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाचे शूटिंग संपले नाही की लगेचच प्रमोशन्स सुरू झाल्याने तिची मात्र चांगलीच धावपळ होताना दिसतेय. ती या धावपळीत एवढी थकून गेलीये की, तिला थोडाही फावला वेळ मिळाला की ती लगेचच थोडासा आराम करते आहे. आता हेच पाहा ना, ती प्रमोशनसाठी एके ठिकाणी गेली असता तिला थोडा वेळ मिळाला. डुलकी घेण्याची ही संधी तिने दवडली नाही. ती छानपैकी सोफा सेटवर झोपलेली असतानाचा हा फोटो कुणीतरी गुपचुप काढला आणि सोशलमीडियावर शेअर केला. ‘करंट स्टेट्स!! एक्झ्हॉस्टेड, अशा कॅप्शनसह पोस्ट केलाय. 

बॉलिवूडची बबली गर्ल परिणीती चोप्रा ही सध्या खुप व्यस्त असली तरीही ती तेवढीच बिनधास्त आहे. सेलिब्रिटी असण्याचे भानही न ठेवता एखाद्या सामान्य मुलीप्रमाणे ती कधीकधी वागताना दिसते. ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटामध्ये तिच्यासोबत आयुषमान खुराना मुख्य भूमिकेत असेल. १२ मे ला चित्रपट रिलीज होणार आहे. 

Web Title: Shot-promotion in the race!