शॉर्ट ड्रेसमध्ये मी कम्फर्टेबल -अमृता फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 19:17 IST2016-12-03T19:17:02+5:302016-12-03T19:17:02+5:30
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो सर्वत्र चर्चेत आहे. ...

शॉर्ट ड्रेसमध्ये मी कम्फर्टेबल -अमृता फडणवीस
ब लिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो सर्वत्र चर्चेत आहे. ज्यात मिसेस फडणवीस यांनी लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलेला आहे. अँग्री यंग मॅन हे नेहमीप्रमाणे हँण्डसम दिसत आहेत. या फोटोवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. पण मिसेस फडणवीस मात्र यावरच ठाम आहेत की, ‘त्या’ शॉर्ट ड्रेसमध्ये मी स्वत:ला कम्फर्टेबल फिल करत होते.
![]()
अमृता फडणवीस यांनी एका म्युझिक अल्बमसाठी अमितजींसोबत फोटोशूट केले. अमृता फडणवीस यांना बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव विचारला असता त्या म्हणाल्या,‘ अमितजींसोबतचे काम करणं माझ्यासाठी स्वप्नवतच आहे. त्यांनी मला कम्फर्टेबल असण्याची फिलिंग दिली. आता मला कळतेय की, त्यांना ‘सुपरस्टार आॅफ द मिलेनियम’ असे का म्हणतात ते कळतेय. त्यांच्या पर्सनॅलिटीने मी खुपच प्रभावित झाले.’
![]()
मुख्यमंत्र्याच्या पत्नीने शॉर्ट ड्रेस का घातला असेल? शॉर्ट ड्रेस घालायलाच हवा होता का? असे एक ना अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित करण्यात आले. पण अमृताजींना जेव्हा याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या,‘मला हा ड्रेस घालण्यात काहीही वावगं वाटले नाही. मी टेनिस खेळतांना शॉर्ट स्कर्ट्स घरी वापरत असते. मी जेव्हा लाल रंगाचा ड्रेस घातला तेव्हा मी खुपच कम्फर्टेबल होते. मला असं वाटतं की, लोकांना माझं २ दिवसांचं फोटोशूट खटकत होतं म्हणून त्यांनी अशा अफवा पसरवल्या. पण, त्यात काहीही तथ्य नाहीये.’