​एप्रिलनंतरच करणार करिना ‘वीरे दी वेडिंग’ची शुटींग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 10:43 IST2016-10-27T10:43:23+5:302016-10-27T10:43:23+5:30

सोनम कपूरची बहीण रिहा दिग्दर्शित करीत असलेला ‘वीरे दी विडेंग’ हा चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे रखडत आहे. मध्यंतरी ...

The shooting of 'Veerre The Wedding' will be done only after April | ​एप्रिलनंतरच करणार करिना ‘वीरे दी वेडिंग’ची शुटींग

​एप्रिलनंतरच करणार करिना ‘वीरे दी वेडिंग’ची शुटींग

नम कपूरची बहीण रिहा दिग्दर्शित करीत असलेला ‘वीरे दी विडेंग’ हा चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे रखडत आहे. मध्यंतरी चित्रपटाचे बजेट शूटींगपूर्वीच वाढल्याने तो बंद पडला असेही सांगण्यात आले. परंतु ती समस्या सुटली असून करिना कपूर गर्भवती असल्यानेसुद्धा शूटींग लांबणीवर पडली आहे.

सुत्रांनुसार करिनाने या चित्रपटातून माघार घेण्याऐवजी पुढील वर्षी एप्रिलनंतर शूटींग सुरू करण्याचे मान्य केले. निर्मातेसुद्धा तिच्याशिवाय चित्रपट करू इच्छित नसल्यामुळे त्यांनी वाट पाहण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर महिन्यात तिची ड्यू डेट असून त्यानंतर चार महिने आराम केल्यावरच ती काम सुरू करणार आहे.

हा चित्रपट संपूर्णत: महिलाकेंद्री असून तीन मैत्रिणींच्या आयुष्याविषयी आहे. एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शिका रिहाने सांगितले होते की, ‘करिना यामध्ये आधुनिक मुलीच्या भूमिकेत असून सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. बेबो प्रॅक्टिकल तर सोनमला थोडीशी हळवी असेल. आपल्याला जे वाटते, ज्यामुळे आनंद मिळतो त्याच गोष्टी करण्यात ती विश्वास ठेवणारी मुलगी आहे.’

                                  Veere Di Wedding

मुलींचा ‘दिल चाहता है’ म्हणूनही या सिनेमाचे वर्णन करण्यात आले होते. मात्र रिहाने हा सिनेमा पूर्णत: वेगळा असल्याचे सांगितले. चित्रपटातील कॉस्ट्युम खरेदी करण्यासाठी सोनम अँड कंपनी लॉस एंजिलिस येथे गेली होती. अत्यंत स्टायलिश आणि मॉडर्न वेशभूषेत सर्व कलाकारा दिसतील, अशी माहिती आहे.

चित्रपटात सोनम व करिनाबरोबर स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिआ यांच्यासुद्धा भूमिका महत्त्वाच्या आहेत. बेबोला जेव्हा ही स्क्रीप्ट देण्यात आली होती तेव्हा ती या कथेच्या प्रेमातच पडली. ती म्हणाली होती की, ‘मला माहीत नाही पण, मी चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या प्रेमात पडले आहे.’

Web Title: The shooting of 'Veerre The Wedding' will be done only after April