‘मनमर्जियाँ’ च्या शूटिंगला ब्रेक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 18:26 IST2016-12-09T18:26:47+5:302016-12-09T18:26:47+5:30
आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर या जोडप्याला आपण ‘दम लगा के हैशा’ मध्ये पाहिलं. दोघांची केमिस्ट्री, भूमिकेला दिलेला आपलेपणा ...
‘मनमर्जियाँ’ च्या शूटिंगला ब्रेक!
आ ुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर या जोडप्याला आपण ‘दम लगा के हैशा’ मध्ये पाहिलं. दोघांची केमिस्ट्री, भूमिकेला दिलेला आपलेपणा आपण अनुभवला. आता हीच जोडी ‘मनमर्जियाँ’ च्या माध्यमातून एका नव्या रूपात आपल्यासमोर येतेय. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘मनमर्जियाँ’ च्या शूटिंगला ब्रेक लागल्याचे कळतेय. उत्तर भारतातील तापमान कमी झाल्याच्या कारणावरून निर्माता आनंद एल.राय यांनी चित्रपटाचे शूटिंग थांबविले आहे.
![]()
शूटिंगला ब्रेक लागल्यानंतर भूमी आणि आयुषमान यांनी त्यांच्या इतर प्रोजेक्टवर लक्ष्य केंद्रित करण्यास सुरूवात केली आहे. आयुषमान ‘बरेली की बर्फी’ तर भूमी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत. आता ते दोघेही उत्तर भारतातील तापमान वाढण्याची वाट पाहत आहेत. त्यांना पुन्हा एकदा चाहत्यांसाठी एका चांगल्या चित्रपटासह परतायचे आहे.