'केजीएफ २'चे जवळपास शूटिंग झाले पूर्ण, फक्त हे काम आहे बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 17:28 IST2021-01-04T17:28:11+5:302021-01-04T17:28:34+5:30

यशच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज असून 'केजीएफ २′ चित्रपटाचे शूटिंग लवकरच संपणार आहे.

The shooting of 'KGF 2' is almost over, only this work is left | 'केजीएफ २'चे जवळपास शूटिंग झाले पूर्ण, फक्त हे काम आहे बाकी

'केजीएफ २'चे जवळपास शूटिंग झाले पूर्ण, फक्त हे काम आहे बाकी

'केजीएफ: चॅप्टर १'मध्ये सुपरस्टार यशच्या विस्मयकारक प्रदर्शनाने थक्क झाल्यानंतर त्याचे चाहते 'केजीएफ: चॅप्टर २' मध्ये त्यांच्या लाडक्या रॉकी भाईची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. ‘केजीएफ: चॅप्टर २’मध्ये यश मुख्य भूमिकेत असून त्याच्यासमोर अभिनेता संजय दत्त असणार आहे. यशच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज असून 'केजीएफ २′ चित्रपटाचे शूटिंग लवकरच संपणार आहे. आता फक्त एक सीन चित्रीत करायचा बाकी आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  'केजीएफ २′मधील फक्त एका सीनचे शूटिंग बाकी आहे. चित्रपटाचे अंतिम वेळापत्रक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कोरोनामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवले होते. परंतु ऑक्‍टोबरमध्ये पुन्हा सुरू झाल्यानंतर यशसह टीमने ते पूर्ण केले आहे.


याबद्दल यशने सांगितले की, 'गेल्या काही काळापासून मी क्‍लायमॅक्‍सचे चित्रीकरण करत आहे. नवीन वर्षात चित्रपटाच्या शेवटचे वेळापत्रक आखले गेले होते. लॉकडाऊन संपल्यानंतर यश आणि चित्रपटातील अन्य कलाकारांनी नॉन स्टॉप काम करत शूटिंग पूर्ण केले आहे.


पहिला भाग संपला तेथून 'केजीएफ-2'ची सुरूवात होण्याची शक्‍यता आहे. दुसऱ्या सीक्‍वलमध्ये यशसह संजय दत्त आणि रवीना टंडन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. यश आणि संजय दत्त यांच्यातील संघर्ष पाहण्यास मिळणार आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, 'केजीएफ चॅप्टर -१'ने बॉक्‍स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती. या चित्रपटामुळे यशला खूप प्रसिद्धी मिळाली. यामुळे या चित्रपटाच्या सीक्‍वलची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Web Title: The shooting of 'KGF 2' is almost over, only this work is left

टॅग्स :kgf 2केजीएफ