Shocking! शाहिद कपूरला प्रेमात धोका देणारी ‘ती’ कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 10:18 IST2017-12-21T04:48:29+5:302017-12-21T10:18:29+5:30

स्वत:चे पर्सनल लाईफ मीडियापासून दूर ठेवणारा शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत अलीकडे एका चॅट शोमध्ये पोहोचलेत. खरे ...

Shocking! Who is Shahid Kapoor who is in love with 'She'? | Shocking! शाहिद कपूरला प्रेमात धोका देणारी ‘ती’ कोण?

Shocking! शाहिद कपूरला प्रेमात धोका देणारी ‘ती’ कोण?

वत:चे पर्सनल लाईफ मीडियापासून दूर ठेवणारा शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत अलीकडे एका चॅट शोमध्ये पोहोचलेत. खरे तर शाहिदने कायम पूर्वायुष्याबद्दल बोलणे टाळले आहे. पण या चॅट शोमध्ये शाहिदने एक धक्कादायक खुलासा केला. तो सुद्धा आपल्या लग्नापूर्वीच्या रिलेशनशिपबद्दलचा. होय, ‘इशारों इशारों’मध्ये शाहिद कपूर आपल्या ‘एक्स’बद्दल बोलून गेला.



नेहा धूपिया होस्ट असलेल्या या शोमध्ये शाहिदला त्याच्या लव्हलाईफबद्दल विचारले गेले. तू कधी तुझ्या को-स्टारच्या प्रेमात पडला आहेस का? असा प्रश्न नेहाने शाहिदला विचारला. हा प्रश्न शाहिद शिताफीने टाळणार, असे वाटत असतानाच त्याने याला होकारार्थी उत्तर दिले. होय, एकदा नाही तर दोनदा मी माझ्या को-स्टारच्या प्रेमात पडलो. यापैकी एक तर आजही खूप लोकप्रीय आहे. पण तिने मला धोका दिला, असे शाहिद म्हणाला. आता शाहिदचा इशारा कुणाकडे होता, हे तुम्ही समजू शकता. होय, त्याचा इशारा कदाचित करिना कपूरकडे होता. शाहिद व करिनाच्या रिलेशनशिपच्या बातम्या एकेकाळी प्रचंड गाजल्या होत्या.

ALSO READ : पुन्हा एकदा झाला शाहिद कपूर अन् करिना कपूरचा आमना-सामना !

 २००४ ते २००७ अशी तीन वर्षे करिना आणि शाहिद एकमेकांना डेट करीत होते. त्यांची लव्हस्टोरी अशी काही बहरली होती की, बॉलिवूडमध्ये हे लव्हबर्ड्स सदैव चर्चेत असायचे. पुढे ते विभक्त झाले. गेल्यावर्षी रिलीज झालेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटात शाहिद आणि करिना एकत्र बघावयास मिळाले होते. मात्र यासाठी दोघांनी एकत्र शूटिंग करणे टाळले होते. त्यानंतर करिनाचा पती सैफ अली खानसोबत ‘रंगून’मध्ये  शाहिद दिसला होता. करिनानंतर शाहिदचे नाव त्याच्या अनेक को-स्टार्सशी जुळले. यानंतर अचानक सर्वांना आश्चर्याचा धक्का देत, शाहिदने मीरा राजपूतसोबत लग्न केले. आत्ताचे म्हणाल तर शाहिद मीरासोबत प्रचंड आनंदी आहे. मीरा व शाहिद या दोघांची मीशा नावाची मुलगीही आहे. तिकडे करिनाही सैफ अली खानची ‘बेगम’ बनून आपल्या वैवाहिक आयुष्यात खुश आहे. तिलाही तैमूर नावाचा मुलगा आहे. कालच तैमूर एक वर्षाचा झाला.

Web Title: Shocking! Who is Shahid Kapoor who is in love with 'She'?