Shocking: जेव्हा 'या' आघाडीच्या अभिनेत्रीला ऑडीशन दरम्यान करावा लागला होता सेक्स सीन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 17:06 IST2020-02-11T17:01:41+5:302020-02-11T17:06:13+5:30
अदितीने २००९ मध्ये दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'दिल्ली 6' मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटातील तिची भूमिका खूपच छोटी होती .

Shocking: जेव्हा 'या' आघाडीच्या अभिनेत्रीला ऑडीशन दरम्यान करावा लागला होता सेक्स सीन !
आजही ऑडीशनवेळी कलाकारांना कोणत्या गोष्टी करायला सांगितले जाईल याचा काही नेम नाही. आजपर्यंत ऑडीशन म्हटले की, सांगितलेल्या घटनेवर अभिनय करून दाखवणे मात्र एका अभिनेत्रीला चक्क सेक्स सीनवर ऑडीशन द्यायला सांगितले होते. ही अभिनेत्री होती अदिती राव हैदरी . दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिचा कटू अनुभव सांगितला.अदितीने २००९ मध्ये दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'दिल्ली 6' मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटातील तिची भूमिका खूपच छोटी होती.
आदितीला एका सिनेमाच्या ऑडिशनच्यावेळेस चक्क सेक्स सीन करून दाखवण्यास सांगितले होते. या सिनेमाचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा यांनी केले होते. याविषयी आदिती सांगते, मला ऑडिशनमध्ये एका मुलासोबत बोल्ड सीन करण्यास सांगितले होते. हे ज्या मुलासोबत करण्यास सांगितले त्या मुलाला मी ओळखत देखील नव्हते. हे काय सुरू आहे हेच मला कळत नव्हते. तो मुलगा अतिशय उंच होता. तसेच तो खूपच विनम्रही होता.
आदितीने यात ज्या मुलाचा उल्लेख केला, तो मुलगा म्हणजे अभिनेता अरुणोदय सिंह असून आदितीच्या दुसऱ्या चित्रपटाच्या म्हणजेच ये साली जिंदगी या चित्रपटाच्या ऑडिशनच्या वेळी ही गोष्ट घडली असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटात अरुणोदय आणि आदिती यांनी एकत्र काम केले होते.