Shocking : साउथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची डान्स रिहर्सल करताना काढली छेड; पोलिसांत गुन्हा दाखल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 20:11 IST2018-02-01T14:41:42+5:302018-02-01T20:11:42+5:30

साउथची प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉलने एका व्यक्तीच्या विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. अमालाने आरोप केला की, एका व्यक्तीने ...

Shocking: South's 'The' Chase Remixed while Rehearsing a Dance of a Favorite Actress; Police filed a complaint! | Shocking : साउथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची डान्स रिहर्सल करताना काढली छेड; पोलिसांत गुन्हा दाखल!

Shocking : साउथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची डान्स रिहर्सल करताना काढली छेड; पोलिसांत गुन्हा दाखल!

उथची प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉलने एका व्यक्तीच्या विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. अमालाने आरोप केला की, एका व्यक्तीने तिची छेड काढली. तिने हा गुन्हा चेन्नई येथील टीनगर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमालासोबत हा प्रकार तेव्हा घडला जेव्हा ती रिहर्सल करीत होती. अमालाचा हा शो मलेशियामध्ये होणार होता. तिने केलेल्या आरोपानुसार, जेव्हा ती डान्सची रिहर्सल करीत होती तेव्हा एका व्यक्तीने तिची छेड काढली. त्यावेळी ती एकटीच होती. अमालाला त्या व्यक्तीच्या बोलण्यावरून असे जाणवले की, तो त्या इव्हेंटशी संबंधित आहे. त्यामुळे तो तिला नुकसान पोहचवू शकत असल्याने तिने पोलिसांत तक्रार करणे अधिक योग्य समजले. 

अमालाने तक्रार दाखल केल्यानंतर मीडियाशी बोलताना म्हटले की, ‘जेव्हा मी डान्स रिहर्सल करीत होती, तेव्हा एक व्यक्ती माझ्याशी अश्लील संवाद साधण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचे बोलणे ऐकून मी अचंबित झाली. मला खूप अपमानित झाल्यासारखे वाटले. त्यामुळे मी लगेचच त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदविली. मी एका इव्हेंटसाठी मलेशियाला जात आहे. त्यासाठी मी डान्स प्रॅक्टिस करीत होती.’ 



वास्तविक अमाला त्या व्यक्तीला ओेळखत नाही. तिने म्हटले की, ‘तो हे जाणून होता की, मी त्या इव्हेंटला केव्हा जाणार आहे. त्यामुळे मी स्वत:ला खूपच असुरक्षित समजू लागली. मी एक इंडिपेंडेंट मुलगी आहे. त्यामुळे मला माझ्या सुरक्षेबद्दल काळजी घ्यावी लागेल. जेव्हा मी स्वत:ला खूपच असुरक्षित समजू लागली तेव्हा मी पोलिसांत जाणे पसंत केले.’ दरम्यान, अमाला ज्या इव्हेंटमध्ये परफॉर्मन्स करणार आहे, त्याचे नाव ‘दजलिंग थमिजासी’ असे आहे. हा इव्हेंट मलेशियात होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमाला कर चोरीप्रकरणी चर्चेत होती. आयकर विभागाने विचारपूस करण्यासाठी तिला अटकही केली होती. 

Web Title: Shocking: South's 'The' Chase Remixed while Rehearsing a Dance of a Favorite Actress; Police filed a complaint!