SHOCKING : प्रियकर फरहान अख्तरच्या घरातून श्रद्धा कपूरला वडिलांनी नेले फरफटत घरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 12:02 IST2016-12-29T12:00:36+5:302016-12-29T12:02:57+5:30
मागच्या अनेक महिन्यांपासून श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तरच्या अफेयर ची चर्चा सुरू आहे. ‘रॉक आॅन २’च्या सेटवर दोघांमध्ये प्रेम ...

SHOCKING : प्रियकर फरहान अख्तरच्या घरातून श्रद्धा कपूरला वडिलांनी नेले फरफटत घरी
म गच्या अनेक महिन्यांपासून श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तरच्या अफेयरची चर्चा सुरू आहे. ‘रॉक आॅन २’च्या सेटवर दोघांमध्ये प्रेम फुलले होते. दोघांनी अधिकृतरीत्या याविषयी माहिती दिली नसली तरी त्यांची सलगी पाहून इंडस्ट्रीमध्ये त्यांच्याविषयी कुजबूज सुरू होती.
मात्र आता लपून-छपून प्रेम करून कंटाळलेल्या श्रद्धाने तिच्या आईवडिलांच्या घरातून सामानसकट बाहेर पडून थेट फरहानच्या घरात ठाण मांडले. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी श्रद्धा फरहानच्या घरी आली खरी पण तिला पुढे काय होणार याची पुसटशी कल्पनाही नव्हती. ते वाचून तुम्हालादेखील जबर धक्का बसेल.
ते दोघे राहत असलेल्या इमारतीमध्ये दोघांच्या नात्याविषयी चर्चा रंगू लागल्या की, फरहान आता लवकरच नात्याला नाव देणार आहे. मात्र आता अशी माहिती मिळतेय की, मोठ्या पडद्यावर खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले श्रद्धाचे वडील शक्ती कपूर तिच्या प्रेमजीवनातीलसुद्धा व्हिलन ठरले आहेत.
रविवारी जेव्हा दरवाजाची बेल वाजली आणि श्रद्धाने दरवाजा उघडला तेव्हा समोरील व्यक्ती पाहून तर ती चांगलीच घाबरून गेली. शक्ती कपूर आणि मवशी पद्मिनी कोल्हापुरे (शक्तीच्या पत्नीची बहिण) तिला घरी नेण्यासाठी आले होते. विवाहित आणि दोन मुलांचा बाप असणाऱ्या फरहानसोबत आपल्या मुलीचे प्रेमसंबंध शक्तीला मुळीच मान्य नाहीत.
![Shakti Kapoor]()
एक व्हिलन : शक्ती कपूर
या तिघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. श्रद्धा सहजासहजी घरी जाण्यास तयार नव्हती. अखेर शक्तीने जोरजबरदस्ती करून तिला घरी नेले. मीडियाला गॉसिप नको म्हणून श्रद्धा चुपचाप गाडीत बसली. तिच्या लव्हस्टोरीमध्ये असादेखील प्रसंग येईल याचा तिने विचारही केला नसेल.
यावर फरहानची प्रतिक्रिया कशी असेल हे पाहणे रंजक ठरेल. दोघांची ‘घनिष्ठ मैत्री’ पाहूनच त्याची पत्नी अधुनाने त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला असून ते वेगळे राहतात. श्रद्धाच्या घरच्यांनासुद्धा या दोघांचे नाते मान्य नाही. दोघांच्या वयातही खूप अंतर असल्याचे त्यांचे म्हणने आहे.