Shocking : शाहरूख खानने म्हटले, ‘मैं कॅरेक्टर लेस हूं, मैं लडकियों को गंदी नजरों से देखता हूं’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2017 16:49 IST2017-06-18T11:19:59+5:302017-06-18T16:49:59+5:30

​तुम्हाला विश्वास नाही बसणार की, बॉलिवूडचा एखादा सुपरस्टार ‘मैं कॅरेक्टर लेस हूं, मैं चीप हूं, मैं लडकियों को गंदी नजरों से देखता हूं’ असे काही म्हणणार.

Shocking: Shah Rukh Khan said, "I am a character lace, I watch the girls with a vicious look" | Shocking : शाहरूख खानने म्हटले, ‘मैं कॅरेक्टर लेस हूं, मैं लडकियों को गंदी नजरों से देखता हूं’

Shocking : शाहरूख खानने म्हटले, ‘मैं कॅरेक्टर लेस हूं, मैं लडकियों को गंदी नजरों से देखता हूं’

म्हाला विश्वास नाही बसणार की, बॉलिवूडचा एखादा सुपरस्टार ‘मैं कॅरेक्टर लेस हूं, मैं चीप हूं, मैं लडकियों को गंदी नजरों से देखता हूं’ असे काही म्हणणार. पण हे खरे आहे. बॉलिवूडचा किंग शाहरूख खानने याच्या तोंडून हे शब्द ऐकवयास मिळणार आहेत. विश्वास बसत नाही ना, पण शाहरूख त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटात अनुष्काला डायलॉग मारताना हे सगळं काही बोलणार आहे. मात्र त्याची झलक शाहरूखने अगोदरच दाखविल्याने सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. 

त्याचे झाले असे की, शाहरूख दिग्दर्शक इम्तियाज अली याच्या बर्थ डे पार्टीत सहभागी झाला होता. यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटीही पार्टीत उपस्थित होते. मग काय, शाहरूखला हा डायलॉग उपस्थिताना ऐकविण्याशिवाय राहिले नाही. शाहरूखने म्हटले की, ‘मैं कॅरेक्टर लेस हूं, मैं चीप हूं, मैं लडकियों को गंदी नजरों से देखता हूं’ यावेळी शाहरूख खान आणि इम्तियाज यांचा ब्रोमांसही बघावयास मिळाला. कारण केक कापल्यानंतर दोघे कधी एकमेकांच्या गळ्यात पडायचे तर कधी एकमेकांना केक भरविताना दिसत होते. 



पार्टीत रणबीर कपूर, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट यांसारखे सेलिब्रिटी उपस्थित होते. सगळ्यांनाच शाहरूखचे डायलॉग अन् इम्तियाजसोबतचा ब्रोमांस बघून आश्चर्य वाटले. काही दिवसांपूर्वीच शाहरूख आणि इम्तियाजने ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. सध्या या चित्रपटाच्या डबिंगचे काम सुरू आहे. शाहरूख इम्तियाजबरोबर पहिल्यांदाच काम करीत असून, तो इम्तियाजविषयी खूपच प्रभावित आहे. 

‘जब हॅरी मेट सेजल’ हा एक रोमॅण्टिक चित्रपट असून, चित्रपटाची शूटिंग प्राग, एम्सटर्डम, लिस्बन आणि बुडापेस्ट येथे झाली आहे. चित्रपटात शाहरूखच्या अपोझित अनुष्का शर्मा बघावयास मिळणार आहे. मात्र अनुष्का या पार्टीत सहभागी झाली नसल्याने तिची कमतरता प्रकर्षाने जाणवत होती. वास्तविक अनुष्का आणि शाहरूख तिसºयांदा एकत्र काम करीत आहेत. या अगोदर ‘रब ने बना दी जोडी’ आणि ‘जब तक है जान’ या चित्रपटात ही जोडी झळकली होती. हा चित्रपट ४ आॅगस्ट रोजी रिलीज होणार आहे. 

Web Title: Shocking: Shah Rukh Khan said, "I am a character lace, I watch the girls with a vicious look"