मलायका अरोराने केले होते धक्कादायक खुलासे, या लोकांनी तिच्याविरोधात रचले होते षड्यंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 13:21 IST2021-05-06T13:20:19+5:302021-05-06T13:21:05+5:30

मलायका अरोरा कधी फिटनेस व्हिडीओ तर ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत येत असते.

Shocking revelations were made by Malaika Arora, these people had hatched a conspiracy against her | मलायका अरोराने केले होते धक्कादायक खुलासे, या लोकांनी तिच्याविरोधात रचले होते षड्यंत्र

मलायका अरोराने केले होते धक्कादायक खुलासे, या लोकांनी तिच्याविरोधात रचले होते षड्यंत्र

मलायका अरोरा बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ती आपल्या फिटनेस व्हिडीओ आणि ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत येत असते. सिनेइंडस्ट्रीत येण्यापूर्वी मलायका प्रसिद्ध मॉडेल होती आणि तिने मॉडेलिंग क्षेत्रात खूप नाव कमावले आहे.


मलायका आता प्रसिद्ध सेलिब्रेटी आहे. एका मुलाखतीत तिने मॉडेलिंग क्षेत्राची काळी बाजू दाखवली होती. एका चॅट शोमध्ये मलायका अरोरा खुलासा केला होता. ती म्हणाली होती की,  जेव्हा तिने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल टाकले होते तेव्हा तिथे आपले स्थान निर्माण करणे सोपे नव्हते.


मलायका अरोराने सिनेइंडस्ट्रीतील दोन मोठ्या व्यक्तींवर तिच्याविरोधात षड्यंत्र रचल्याचा आरोप केला होता. मलायका अरोरा म्हणाली होती की, त्या काळात सीनिअर मॉडेल्स बॅकस्टेज नवीन मुलींविरोधात षड्यंत्र रचत बोते. त्या स्वार्थी नव्हत्या पण मेहर जेसिया आणि नम्रता शिरोडकर यासारख्या व्यक्तींनी त्या काळात माझ्याविरोधात खूप षड्यंत्र रचले होते.


मेहर आणि नम्रताचे नाव ऐकून शोची होस्ट नेहा धुपिया अवाक् झाली होती.त्यानंतर मलायकाने म्हटले होते की, मला मेहर आणि नम्रतासोबत काही तक्रार नाही आणि सध्याच्या काळात त्या दोघी माझ्या खूप चांगले मित्र आहेत.


या मुलाखतीत मलायकाने आपली बेस्ट फ्रेंड्सपैकी एक करीना कपूरची पोलखोल केली होती. जेव्हा नेहा धुपियाने तिला एक वाक्य स्टॉप....करीनाच्या मध्ये एख शब्द भरण्यासाठी सांगितले होते. त्यावेळी मलायकाने स्टॉप गॉसिपिंग करीना. मलायकाच्या उत्तरातून स्पष्ट होते की, बॉलिवूडची गॉसिप क्वीन करीना आहे, जिला बॉलिवूडची प्रत्येक बातमी माहित आहे.

Web Title: Shocking revelations were made by Malaika Arora, these people had hatched a conspiracy against her