SHOCKING!! करण जोहरला नोटीस, होऊ शकतो पाच वर्षांचा कारावास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 12:37 IST2018-01-24T07:07:36+5:302018-01-24T12:37:36+5:30
करण जोहर पुन्हा वादात सापडला आहे. होय, सध्या करण जोहर आणि रोहित शेट्टी ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार’ हा रिअॅलिटी शो होस्ट ...

SHOCKING!! करण जोहरला नोटीस, होऊ शकतो पाच वर्षांचा कारावास!
क ण जोहर पुन्हा वादात सापडला आहे. होय, सध्या करण जोहर आणि रोहित शेट्टी ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार’ हा रिअॅलिटी शो होस्ट करत आहेत. याच शोमुळे करण जोहरने नसते संकट ओढवून घेतले आहे. होय, या शोमध्ये कमला पान पसंद या पान मसाल्याची जाहिरात दाखवणे चॅनल मालकासह करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनला महाग पडले आहे. दिल्ली आरोग्य विभागाने याप्रकरणी ‘सिगारेट अॅण्ड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स अॅक्ट २००३’ अंतर्गत करण जोहर आणि धर्मा प्रॉडक्शनला नोटीस जारी केले आहे. चॅनल मालक, एंडमोल प्रॉडक्शन कंपनी आणि संबंधित पान मसाला कंपनीलाही नोटीस जारी करण्यात आले आहे. ही कंपनी गुटखा व पान मसाला बनवते. या प्रकरणात दोषी आढळल्यास पाच वर्षांचा कारावास आणि २ हजारांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते.
करण व रोहित शेट्टी या शोचे जज आहे. या शोच्या सुरूवातील धर्मा प्रॉडक्शनचे नाव येते. त्यामुळे धर्मा प्रॉडक्शनही वादात सापडले आहे. टीव्ही शोदरम्यान गुटख्याचा प्रचार करण्याचा आरोप करत, दहा दिवसांच्या आत यावर खुलासा करण्याचे या नोटीसमध्ये बजावले आहे.‘इंडिया नेक्स्ट सुपरस्टार’ शोच्या सर्व लोकांना ‘सरोगेटेड एड’ दाखवल्याबद्दलही दोषी ठरवण्यात आले आहे.
ALSO READ : करण जोहर अन् रोहित शेट्टीचा ‘इंडिया का अगला सुपरस्टार’ वादात! वाचा,पोलखोल बातमी!!
दिल्ली आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जाहिरात त्वरित बंद केली नाही तर करण जोहरला सर्वाधिक नुकसान सोसावे लागू शकते. कारण ‘सिगारेट अॅण्ड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स अॅक्ट २००३’ करणला दुसºयांदा नोटीस जारी करण्यात आले आहे. यात दोषी आढळल्यास त्याना पाच वर्षांचा कारावास आणि दोन हजारांना दंड भोगावा लागू शकतो. १० दिवसांच्या आत समाधानकारक उत्तर न आल्यास कोर्टात केस दाखल करण्याचा इशाराही दिल्ली आरोग्य विभागाने दिला आहे.
यापूर्वीही दिल्ली आरोग्य विभागाने ‘इत्तेफाक’च्या एका पोस्टरवरून करण व त्याच्या धर्मा प्रॉडक्शनला नोटीस जारी केले होते. यानंतर धर्मा प्रॉडक्शनने लेखी चूक कबुल करत देशभरातील चित्रपटगृहांतून चित्रपटाचे संबंधित पोस्टर मागे घेतले होते.