​shocking !! फातिमा सना शेखमुळे आमिर खान व किरण रावच्या संसारात धुसफूस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 10:49 IST2017-05-11T05:19:04+5:302017-05-11T10:49:04+5:30

अनेक अफवा आणि चर्चेनंतर आमिर खानच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’साठी अभिनेत्री फातिमा सना शेख हिचे नाव फायनल झालेय. यातच एक ...

Shocking !! Fathima Sana Sheikh's fury in Amir Khan and Kiran Rao? | ​shocking !! फातिमा सना शेखमुळे आमिर खान व किरण रावच्या संसारात धुसफूस?

​shocking !! फातिमा सना शेखमुळे आमिर खान व किरण रावच्या संसारात धुसफूस?

ेक अफवा आणि चर्चेनंतर आमिर खानच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’साठी अभिनेत्री फातिमा सना शेख हिचे नाव फायनल झालेय. यातच एक हॉट बातमी आलीय. होय, या चित्रपटात फातिमाला घेतल्याबद्दल आमिरची पत्नी किरण राव नाखूश असल्याचे कळतेय. खरे तर आमिर व फातिमाला एकत्र काम करताना किरणने पाहिले आहे. मग आत्ताच आमिर व फातिमाच्या एकत्र काम करण्यावर किरणला आक्षेप का असावा? चर्चा तर बरीच काही ऐकायला मिळतेय. होय, फातिमा सना शेखवरून आमिर व किरणमध्ये भांडणे सुरु झाल्याचेही समजतेय. याचे कारण म्हणजे, फातिमासोबत आमिरची वाढती जवळीक.

 

होय, ‘दंगल’मध्ये आमिर व फातिमा या दोघांनी बाप-लेकीची भूमिका साकारली होती. पण आता ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये आमिर व फातिमा दोघेही एकमेकांशी रोमान्स करताना दिसणार आहेत. अलीकडे फातिमाने यावर अगदी बिनधास्त उत्तरही दिले होते. एका चित्रपटात मी आमिरची मुलगी झाली असले आणि दुसºयाच चित्रपटात मला त्याच्यासोबत रोमान्स करायचा असल्यास, मला काहीही आक्षेप नाही. मी एक कलाकार आहे आणि माझ्या वाट्याला ज्या भूमिका येतील, त्या करायला मला आवडेल, असे ती म्हणाली होती.



ALSO READ : आमिर खान व फातिमा सना शेखा इंटेन्स सीन आणि वाद पक्का??

‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटांसाठी अनेक अभिनेत्रींच्या नावांची चर्चा होती. पण चर्चा खºया मानाल तर, हा चित्रपट केवळ आणि केवळ आमिरच्या शिफारसीमुळे फातिमाला मिळाला. त्याच्या काही दिवस आधीपासून आमिर व फातिमाच्या वाढत्या जवळीकीच्या बातम्या दबक्या आवाजात सुरु होत्या. दोघेही परस्परांच्या बरेच जवळ आले आहेत आणि हे नाते मैत्रीपेक्षा बरेच पुढे गेलेय, अशीही चर्चा रंगली. या बातम्यांनी किरण राव अस्वस्थ असल्याचे कळतेय. किरणने आमिरला फातिमाला चित्रपटात घेण्यास मनाई केली होती. पण आमिरने मानले नाही. हेच सध्या दोघांच्या वादाचे कारण ठरत आहे.

Web Title: Shocking !! Fathima Sana Sheikh's fury in Amir Khan and Kiran Rao?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.