"शिवनेरीच्या मातीचा आशीर्वाद..." छत्रपतींच्या जन्मभूमीवर रितेश देशमुख नतमस्तक, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:53 IST2026-02-19T15:21:59+5:302026-02-19T16:53:45+5:30

अभिनेता रितेश देशमुखनं शिवनेरी किल्ल्यावर जाऊन महाराजांच्या चरणी माथा टेकवला.

Shivjayanti 2026 Riteish Deshmukh Shivneri Fort Visit Video | "शिवनेरीच्या मातीचा आशीर्वाद..." छत्रपतींच्या जन्मभूमीवर रितेश देशमुख नतमस्तक, पाहा व्हिडीओ

"शिवनेरीच्या मातीचा आशीर्वाद..." छत्रपतींच्या जन्मभूमीवर रितेश देशमुख नतमस्तक, पाहा व्हिडीओ

Shivjayanti 2026: आज १९ नोव्हेंबर हा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण राज्यभरात आज उत्साहाचं वातावरण आहे. ठिकठिकाणी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवजयंतीनिमित्त जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झाले आहेत. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखनं शिवनेरी किल्ल्यावर जाऊन महाराजांच्या चरणी माथा टेकवला.

रितेशने आपल्या या शिवनेरी भेटीचा एक अतिशय सुंदर आणि भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख शिवनेरीचा गड चढताना दिसत आहे. यावेळी गडावर आलेल्या अनेक शिवभक्तांशी त्याने आपुलकीने संवाद साधला. महाराजांच्या जन्मस्थळी पोहोचल्यानंतर रितेश कमालीचा भावुक झाला होता. शिवजन्मस्थळावर नतमस्तक होऊन त्याने महाराजांचा आशीर्वाद घेतला. 

या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये रितेशनं लिहलं, "शिवनेरीच्या मातीचा आशीर्वाद आणि लाखो शिवभक्तांच्या प्रेमाच्या जोरावर सुरू करतोय एक नवीन प्रवास! अशा साहसी आणि महान राजाला माझा मानाचा मुजरा... माझा राजा, माझा अभिमान!".


'राजा शिवाजी'साठी मोठी उत्सुकता
रितेश देशमुखने काही दिवसांपूर्वीच 'राजा शिवाजी' चित्रपटाची अधिकृत घोषणा केली होती. या चित्रपटात रितेश स्वतः 'छत्रपती शिवाजी महाराजांची' भूमिका साकारणार असून, भाग्यश्री पटवर्धन 'जिजामातांच्या' भूमिकेत दिसणार आहे. अजय-अतुल यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. 'राजा शिवाजी' सिनेमात संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, फरदीन खान, अभिषेक बच्चन, जितेंद्र जोशी अशी स्टारकास्ट आहे. 'राजा शिवाजी' सिनेमा १ मे २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मराठीसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये सिनेमा रिलीज केला जाणार आहे. 

Web Title : रितेश देशमुख ने शिवनेरी में छत्रपति शिवाजी महाराज को नमन किया।

Web Summary : शिवजयंती पर, रितेश देशमुख शिवाजी महाराज के जन्मस्थान, शिवनेरी किले गए। उन्होंने अपनी भावुक यात्रा का एक वीडियो साझा किया, जिसमें श्रद्धा व्यक्त की गई। वह फिल्म 'राजा शिवाजी' में शिवाजी महाराज की भूमिका निभाएंगे, जो 1 मई, 2026 को छह भाषाओं में रिलीज होगी।

Web Title : Riteish Deshmukh bows at Shivneri, birthplace of Shivaji Maharaj.

Web Summary : On Shivjayanti, Riteish Deshmukh visited Shivneri Fort, Shivaji Maharaj's birthplace. He shared a video of his emotional visit, expressing reverence. He is set to portray Shivaji Maharaj in the film 'Raja Shivaji', releasing May 1, 2026, in six languages.