शिल्पा शेट्टी यंदा साजरा करणार नाही गणेशोत्सव, सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाली- "आमच्या घरात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:45 IST2025-08-25T13:45:11+5:302025-08-25T13:45:36+5:30
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरीही दरवर्षी गणरायाचं आगमन होतं. पण, यावर्षी मात्र शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरी बाप्पा विराजमान होणार नाहीत. यामागचं कारण अभिनेत्रीने सांगितलं आहे.

शिल्पा शेट्टी यंदा साजरा करणार नाही गणेशोत्सव, सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाली- "आमच्या घरात..."
गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दरवर्षी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करतात. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरीही दरवर्षी गणरायाचं आगमन होतं. मोठ्या उत्साहात शिल्पा आणि राज कुटुंबीयांसह गणेशोत्सव साजरा करतात. पण, यावर्षी मात्र शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरी बाप्पा विराजमान होणार नाहीत. यामागचं कारण अभिनेत्रीने सांगितलं आहे.
शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने यावर्षी गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचं म्हटलं आहे. कुंद्रा कुटुंबातील नातेवाईकाचं निधन झाल्याने यावर्षी शिल्पा शेट्टीला गणेशोत्सव साजरा करता येणार नाही. "आम्हाला हे सांगण्यास अत्यंत दु:ख होत आहे की आमच्या कुटुंबातील नातेवाईकाचं दु:खद निधन झालं आहे. त्यामुळे यावर्षी आम्ही गणेशोत्सव साजरा करणार नाही. प्रथेनुसार, १३ दिवस आम्ही दु:खात असू. त्यामुळे आम्हाला कोणतेही धार्मिक सण या दिवसांत साजरे करता येणार नाहीत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा गणेशोत्सव साजरा करतात. वाजत गाजत त्यांच्या घरी गणरायाचं आगमन होतं. तर मोठ्या भक्तीभावाने ते गणरायाला निरोप देतात. पण, यंदा मात्र ते गणेशोत्सव साजरा करणार नाहीत.