मी चुकले पण...! शिल्पा शेट्टीची पोस्ट क्षणात झाली व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 12:13 PM2021-08-27T12:13:03+5:302021-08-27T12:13:45+5:30

पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी काही दिवस अचानक गायब झाली होती. पण आता पुन्हा एकदा शिल्पा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झालेली दिसतेय.

Shilpa Shetty shares a cryptic post Made a mistake but it's ok | मी चुकले पण...! शिल्पा शेट्टीची पोस्ट क्षणात झाली व्हायरल

मी चुकले पण...! शिल्पा शेट्टीची पोस्ट क्षणात झाली व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देशिल्पा काही दिवसांपूर्वी ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मध्ये परतली आहे. पतीच्या अटकेनंतर शिल्पाने या शोमध्ये येणे टाळले होते.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ( Shilpa Shetty) पती  राज कुंद्रा (Raj Kundra) पोर्नोग्राफी प्रकरणात तुरूंगात आहे. गेल्या 19 जुलैला मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला बेड्या घातल्या आणि तेव्हापासून तो तुरूंगात आहे. पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी काही दिवस अचानक गायब झाली होती. ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ या शोमधूनही काही दिवस तिने ब्रेक घेतला होता. सोशल मीडियापासूनही ती दूर होती. पण आता पुन्हा एकदा शिल्पा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झालेली दिसतेय. आता शिल्पाने एक गर्भित पोस्ट शेअर करत, सर्वांचे लक्ष वेधले आहे.  

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एका पुस्तकातल्या पानावरचा उतारा शेअर केला आहे. सोफिया लॉरेनचा एक कोट या पानावर आहे. ‘केलेल्या चूकीची भरपाई आपल्याला आयुष्यभर करावी लागते. आपण आपले आयुष्य काहीही चुका न करता रोचक बनवू शकत नाही. काही भयानक वा कोणाला दुखावणारी चूक होऊ नये, अशी अपेक्षा आपण करतो. पण तरीही चुका होतात...,’ असे या  उता-यात लिहिले आहे.   ‘मी चूक करणार, मी त्यातून शिकणार आणि स्वत:ला माफ करणार,’ अशी एक ओळ उता-याच्या शेवटी आहे. या पोस्टसोबत शिल्पाने एक अ‍ॅनिमेटेड स्टीकरही शेअर केले आहे. ‘मी एक चूक केलीये, पण ठीक आहे..,’ असे त्यात लिहिले आहेत. 

 यापूर्वीही शिल्पाने एक इन्स्टास्टोरी शेअर केली होती. ‘आपण आपल्या आयुष्यात पॉजचे बटण दाबू शकत नाही. प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. मग तुम्ही चांगल करा वा वाईट, काहीही होऊ देत, आयुष्य चालत राहणार. आयुष्यात एकमेव गोष्ट आपल्याकडे आहे आणि ती म्हणजे वेळ. आयुष्यातला प्रत्येक क्षण जगा,’ असा मॅसेज तिने शेअर केला होता.
शिल्पा काही दिवसांपूर्वी ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मध्ये परतली आहे. पतीच्या अटकेनंतर शिल्पाने या शोमध्ये येणे टाळले होते. पण ती शोवर परतल्यावर सर्वांनी तिचे जोरदार स्वागत केले होते. हे पाहून शिल्पाला अश्रू अनावर झाले होते.

Web Title: Shilpa Shetty shares a cryptic post Made a mistake but it's ok

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.