काय होतीस तू... काय झालीस तू...! या अभिनेत्रीची ही दशा पाहून उडेल तुमची झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 12:00 IST2020-04-21T11:59:49+5:302020-04-21T12:00:22+5:30

ही अभिनेत्री फिटनेसमुळे असते चर्चेत

Shilpa Shetty shared new tiktok video | काय होतीस तू... काय झालीस तू...! या अभिनेत्रीची ही दशा पाहून उडेल तुमची झोप

काय होतीस तू... काय झालीस तू...! या अभिनेत्रीची ही दशा पाहून उडेल तुमची झोप

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत येत असते. तसेच ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती चाहत्यांशी संवाद साधत असते व फोटो शेअर करत असते. त्यात अलिकडेच शिल्पाचे टिकटॉकवर 15 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. ही आनंदाची बातमी शिल्पाने आपल्या मुली समिशासह आपल्या चाहत्यांना दिली. आपल्या एकाहून एक सरस टिकटॉक व्हिडिओने ती आपल्या चाहत्यांना लॉकडाऊनच्या खूश ठेवत तर आहेच पण हे व्हिडिओ करत असताना ती स्वत: किती एन्जॉय करते हे आपल्याला तिच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसेल. नुकताच तिने आपला एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधील तिचा अवतार पाहून तुमची झोपच उडेल.

शिल्पाच्या या व्हिडिओमध्ये ती जितकी भयानक तितकीच क्युट दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले की, आँखे जब भी खोलेगा तू पायेगा मुझे, पहले खुदको डराउंगी फिर डराउंगी तुझे. हा व्हिडिओ शेअर करत तिने घरात रहा आणि सुरक्षित राहण्याचे आवाहनदेखील केले आहे.

नुकताच तिने एक नवा टिकटॉक व्हिडिओ शेअर केला होता. हा एक मराठमोळ्या गाण्यावर व्हिडिओ आहे. त्यावर राज आणि शिल्पा च्या खट्याळ गोष्टी पाहून तुम्हाला पोट धरून हसायला लावतील.

शिल्पा शेट्टी या व्हिडिओमध्ये 'सूया घे पोत घे' या गाण्यावर यावर धमाल हावभाव देताना दिसत आहे.

Web Title: Shilpa Shetty shared new tiktok video