हॉलिवूड अभिनेत्याबरोबर फोटो काढण्यासाठी गेलेल्या शिल्पा शेट्टीला आला वाईट अनुभव, म्हणाली, "बॉडीगार्डने धक्का दिला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 18:46 IST2023-09-26T18:35:26+5:302023-09-26T18:46:35+5:30

शिल्पाने 'बिग बॉस' फेम शहनाज गिलच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने हॉलिवूड सुपरस्टारबरोबर फोटो काढण्याचा अनुभव शेअर केला.

shilpa shetty shared experience when she pushed by hollywood actor arnold schwarzenegger bodygaurd for clicking photos | हॉलिवूड अभिनेत्याबरोबर फोटो काढण्यासाठी गेलेल्या शिल्पा शेट्टीला आला वाईट अनुभव, म्हणाली, "बॉडीगार्डने धक्का दिला..."

हॉलिवूड अभिनेत्याबरोबर फोटो काढण्यासाठी गेलेल्या शिल्पा शेट्टीला आला वाईट अनुभव, म्हणाली, "बॉडीगार्डने धक्का दिला..."

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी 'सुखी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शिल्पा सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 'सुखी' चित्रपटाच्या निमित्ताने ती अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिल्पाने तिच्या बरोबर घडलेला एक किस्सा सांगितला. 

शिल्पाने 'बिग बॉस' फेम शहनाज गिलच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने हॉलिवूड सुपरस्टारबरोबर फोटो काढण्याचा अनुभव शेअर केला. शिल्पा ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, त्याच हॉटेलमध्ये हॉलिवूड स्टार अर्नोल्ड श्वार्जनेगर इव्हेंटसाठी आला होता. शिल्पाने त्याला बघताच पायातील हाय हील्स काढत त्याच्या दिशेने ती धावत सुटली. त्याच्याबरोबर फोटो काढायचे आहेत, असं शिल्पाने पती राज कुंद्राला सांगितलं. 

पण, अर्नोल्ड श्वार्जनेगरच्या बॉडीगार्डने शिल्पाला त्या अभिनेत्याबरोबर फोटो काढून दिले नाहीत. अर्नोल्डच्या बॉडीगार्ड्सने शिल्पाला धक्का देत तिथून बाजूला केलं. हे पाहून राज कुंद्रा संतापला होता. त्यानंतर राज कुंद्रा आणि त्या बॉडीगार्डमध्ये वाद झाला. शिल्पा प्रसिद्ध अभिनेत्री असल्याचंही कुंद्राने त्या बॉडीगार्डला सांगितलं. परंतु, तरीही त्याने फोटो काढून दिला नाही. या संपूर्ण प्रकारामुळे शिल्पाला फार वाईट वाटलं होतं. त्यानंतर अर्नोल्डला या घटनेबद्दल समजताच दुसऱ्या दिवशी त्याने स्वत: शिल्पाबरोबर फोटो काढला. 

या घटनेनंतर एखाद्या चाहत्याला कलाकार फोटो काढण्यासाठी नकार देतात तेव्हा त्यांना कसं वाटतं, याची जाणीव शिल्पाला झाली. त्यामुळे कोणत्याही चाहत्याला फोटो काढण्यासाठी नकार देत नसल्याचंही शिल्पाने मुलाखतीत सांगितलं.

Web Title: shilpa shetty shared experience when she pushed by hollywood actor arnold schwarzenegger bodygaurd for clicking photos