पाच वर्षांपासून सुरु होते प्रयत्न...! दुस-यांदा आई झालेल्या शिल्पा शेट्टीचा खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 12:03 IST2020-02-23T12:03:10+5:302020-02-23T12:03:20+5:30

वयाच्या 44 व्या वर्षी शिल्पा दुस-यांदा आई झाली. 15 फेब्रुवारीला शिल्पाला मुलगी झाली.

shilpa shetty first reaction on become mother again says i am trying for this last 5 years | पाच वर्षांपासून सुरु होते प्रयत्न...! दुस-यांदा आई झालेल्या शिल्पा शेट्टीचा खुलासा 

पाच वर्षांपासून सुरु होते प्रयत्न...! दुस-यांदा आई झालेल्या शिल्पा शेट्टीचा खुलासा 

ठळक मुद्देशिल्पाने 21 तारखेला मुलीच्या जन्माची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अलीकडे चाहत्यांना एक गोड बातमी देत आश्चर्याचा धक्का दिला. वयाच्या 44 व्या वर्षी शिल्पा दुस-यांदा आई झाली. 15 फेब्रुवारीला शिल्पाला मुलगी झाली. सरोगसीच्या माध्यमातून शिल्पाच्या मुलीचा जन्म झाला. शिल्पाने आपल्या मुलीचे नाव समिशा शेट्टी ठेवले आहे. कन्येच्या आगमनानंतर शिल्पावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. याचदरम्यान शिल्पाने मुलीच्या जन्माबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.


होय, मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने मुलीच्या जन्माबद्दल सांगितले. ती म्हणाली, ‘मला आणि राजला एक मुलगी हवी होती. आम्ही गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्न करत होतो. अखेर मुलीची आमची इच्छा पूर्ण झाली. 2009 मध्ये माझे व राजचे लग्न झाले. 2012 मध्ये आमचा मुलगा वियानचा जन्म झाला. वियानच्या जन्माने आम्ही खूप आनंदात होतो. पण तेव्हापासून पुढे काय करायचे याचे प्लॅनिंग सुरु होते.अलीकडे ‘निकम्मा’ आणि ‘हंगामा’ हे दोन चित्रपट साईन केलेत, तेव्हाच या फेब्रुवारीत आम्ही दुस-यांदा आई-वडिल बनणार असल्याची गोड बातमी आम्हाला मिळाली होती. त्यामुळे फेब्रुवारीपूर्वी हातातले संपूर्ण काम संपवण्याचे माझे प्रयत्न होते. माझ्या टीममुळे ते शक्य झाले. सध्या आम्ही समिशासोबतचा प्रत्येक क्षण एन्जॉय करत आहोत.  ’


शिल्पाने 21 तारखेला मुलीच्या जन्माची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. शिवाय आपल्या मुलीच्या नावाचा अर्थही सांगितला होता. ‘आम्ही आमच्या मुलीचे नाव समिशा ठेवले आहे. ‘सा’ संस्कृतचा शब्द आहे. याचा अर्था ‘टू हॅव’ असा होता. तर ‘मिशा’ हा एक रशियन शब्द आहे. याचा अर्थ ‘परमेश्वरासमान’ असा होतो. आमच्या घरी आलेल्या लक्ष्मीने आमचे कुटुंब पूर्ण केले,’ असे शिल्पाने लिहिले होते.

Web Title: shilpa shetty first reaction on become mother again says i am trying for this last 5 years