शिल्पा शेट्टीने मुलाच्या वाढदिवसासाठी लंडन येथून मागविला केक, अशी सेलिब्रेट केली पार्टी, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 15:39 IST2018-05-26T09:11:41+5:302018-05-26T15:39:27+5:30

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने मुलाच्या वाढदिवसासाठी लंडन येथून केक मागविला होता. शिल्पाने वाढदिवसानिमित्त दिलेली पार्टी खास होती, पाहा व्हिडीओ!

Shilpa Shetty celebrated birthday cake from London for her birthday, watch the video! | शिल्पा शेट्टीने मुलाच्या वाढदिवसासाठी लंडन येथून मागविला केक, अशी सेलिब्रेट केली पार्टी, पाहा व्हिडीओ!

शिल्पा शेट्टीने मुलाच्या वाढदिवसासाठी लंडन येथून मागविला केक, अशी सेलिब्रेट केली पार्टी, पाहा व्हिडीओ!

टनेस फ्रीक म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा नेहमीच व्हिडीओ आणि पुस्तकांच्या माध्यमातून फिटनेसबद्दल जनजागृती करताना दिसते. फिटनेसलाच महत्त्व देताना यावेळेस तिने मुलगा वियानचा वाढदिवस साजरा केला. होय, यावेळेस शिल्पाने मुलाच्या वाढदिवसानिमित्त शुगर फ्री पार्टी दिली. शिल्पाचा मुलगा वियान गेल्या २१ मे रोजी सहा वर्षांचा झाला आहे. याच आनंदाच्या क्षणी अभिनेत्री तथा नवोदित लेखिका शिल्पाने शुगर फ्री पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी शिल्पाने पार्टीत केकदेखील नारळ, फु्रट लॉलीज आणि याकुल्टसारख्या आरोग्यदायी पोष्टिक पदार्थांनी बनलेला मागविला होता. 
 

यावेळी शिल्पाने म्हटले की, यावर्षी मी माझ्या मुलाचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करीत आहे की, पार्टीतील कुठल्याही खाद्य पदार्थात रिफाइंड शुगर नाही. त्यासाठी मी लंडन येथून लॉलीपॉप्स मागविले आहेत, जे शुद्ध फळांनी बनविलेले आहेत. तसेच त्यात रिफाइंड शुगरही नाही. डेजर्टसाठी आम्ही कोकोनट शुगर आणि मधाचा प्रयोग केला आहे. 
 

पुढे सांगताना शिल्पा म्हणाली की, मला असे वाटते की, अशापद्धतीने आपण आपल्या मुलांना शिकवू शकतो की, त्यांनी कशापद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. दरम्यान, शिल्पाने लंडन येथून मागविलेला केक पूजा ढिंगराने बनविलेला आहे. पूजाने हा केक कोकोनट शुगरने बनविला आहे. केकची टेस्ट खूपच स्वादिष्ट असल्याने बच्चे कंपनीने त्यावर चांगलाच ताव मारल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसून येते. 
 

दरम्यान, वियानच्या वाढदिवसासाठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी आपल्या मुलाला घेऊन पार्टीत सहभागी झाले होते. अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हीदेखील मुलगी आराध्यासोबत पार्टीत उपस्थित होती. त्याचबरोबर इतरही बरेचशा सेलिब्रिटींनी पार्टीत हजेरी लावली. 
 

Web Title: Shilpa Shetty celebrated birthday cake from London for her birthday, watch the video!