नजर हटी, दुर्घटना घटी... पिट गए पति़! पतीने केले मोलकरणीला KISS, शिल्पा शेट्टीने अशी केली धुलाई!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 17:04 IST2020-05-15T17:03:12+5:302020-05-15T17:04:05+5:30

शिल्पाच्या पतीने मोलकरणीला किस केले आणि मग काय शिल्पाने पतीची जाम धुलाई केली.

Shilpa Shetty beats up husband Raj Kundra for kissing the house help in this hilarious video-ram | नजर हटी, दुर्घटना घटी... पिट गए पति़! पतीने केले मोलकरणीला KISS, शिल्पा शेट्टीने अशी केली धुलाई!!

नजर हटी, दुर्घटना घटी... पिट गए पति़! पतीने केले मोलकरणीला KISS, शिल्पा शेट्टीने अशी केली धुलाई!!

ठळक मुद्देशिल्पा आपल्या सोशल मीडियावर असे मजेशीर व्हिडिओ शेअर करत असते.

कोरोनामुळे अख्खा देश लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊनच्या काळात सगळेजण आपआपल्या घरात कैद आहे. आता एका घरात कैद म्हटल्यावर ‘राडा’ तर होणारच. आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्याच घरी पाहा. शिल्पाच्या पतीने मोलकरणीला किस केले आणि मग काय शिल्पाने पतीची जाम धुलाई केली.
होय, आपल्या पतीने दुस-या महिलेचे साधे कौतुक केलेलेही पत्नींना खपत नाही. अशात चक्क नव-याने मोलकरणीचा किस घेतला म्हटल्यावर कुठलीही बायको संतापेल. मग ती शिल्पा शेट्टीसारखी सेलिब्रिटी असली म्हणून काय? शिल्पाने नव-याची चांगलीच धुलाई केली आणि विशेष म्हणजे सोशल मीडियावर या धुलाईचा व्हिडीओही शेअर केला. हा शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्राचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

 शिल्पाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही.
मुळात हा एक टिकटॉक व्हिडीओ आहे. व्हिडीओत  शिल्पा तिचे कपाट आवरत असते आणि त्यावेळी राज तिला किस करतो . ‘कामाच्या वेळी किस करू नको’, म्हणून शिल्पा आपल्या पतीला दटावते. ती अशी दटावत असतानाच त्यांची मोलकरीण, ‘मॅडम चांगल्या पद्धतीनं समजवा, मी तर बोलून बोलून थकले’, असं मागून म्हणते. मोलकरीणीच्या तोंडून हे ऐकताच शिल्पा आपल्या पतीला मारायला सुरुवात करते.हा व्हि़डिओ शेअर करताना शिल्पाने, ‘नजर हटी, दुर्घटना घटी!  सच्चाई पता चलने पर, पिट गए हमारे पति’ अशी पोस्ट लिहिली आहे.

या व्हिडिओत शिल्पानेडबल रोल केला आहे. शिल्पाकडे पतीची तक्रार करणारी मोलकरीणही शिल्पाच आहे. आता हा एक मजेशीर व्हिडीओ आहे आणि शिल्पाने केवळ चाहत्यांच्या मनोरंजनासाठी तो केला आहे, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच.


 
शिल्पा आपल्या सोशल मीडियावर असे मजेशीर व्हिडिओ शेअर करत असते. याआधीही शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात शिल्पा आपल्या प्रश्नांची राजलाइतके भांडावून सोडते की, तो तिच्यावर भडकतो.  मॉर्डन महाभारतवाला तिचा टिकटॉक व्हिडिओ लोकांना आवडला होता. यात शिल्पा आपल्या पतीसह युद्ध करताना दिसली होती.

Web Title: Shilpa Shetty beats up husband Raj Kundra for kissing the house help in this hilarious video-ram