फरहान अख्तर आणि शिबानीचा तो फोटो पाहून लोक म्हणाले- “दूर रहो कोरोना है…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 11:57 IST2020-03-18T11:51:14+5:302020-03-18T11:57:57+5:30

काही लोकांनी तर त्यांना मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे.

Shibani dandekar and farhan akhtar get trolled gda | फरहान अख्तर आणि शिबानीचा तो फोटो पाहून लोक म्हणाले- “दूर रहो कोरोना है…”

फरहान अख्तर आणि शिबानीचा तो फोटो पाहून लोक म्हणाले- “दूर रहो कोरोना है…”

प्रसिद्ध अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक फरहान अख्तर गेल्या कित्येक महिन्यांपासून मॉडेल शिबानी दांडेकर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्या दोघांना बऱ्याचदा एकत्र पाहिले जाते. सोशल मीडियावर देखील ते दोघे एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत असतात आणि ट्रोर्लस त्यांना ट्रोल करत असतात. शिबानीने फरहानसोबत  शेअर केलेल्या रोमाँटिक फोटोमुळे हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 


शिबानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फरहानसोबतचा फोटो शेअर करत त्याला 'बेटर हाफ'असे कॅप्शन दिले आहे. या फोटोत काही ठिकाणी सफेद डाग दिसतायेत. यावरुन दोघांची खिल्ली ट्रोलर्सनी उडवली आहे. ट्रोलर्सनी शिबानीच्या केसात डॅन्ड्रफ  आहे असे म्हणतात खिल्ली उडवली आहे. तर काही लोकांनी कोरोना व्हायरसमुळे दोघांना लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. तर काही लोकांनी मास्क लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.  

गेल्या काही दिवसांपासून  बी-टाऊनमध्ये फरहान आणि शिबानीच्या लग्नाच्या चर्चा होत्या मात्र  सध्या तरी लग्न करण्याचा विचार करत नसल्याचे या कपलचे म्हणणे आहे.  ते सध्या कपल म्हणूनच एकमेकांसोबत खूश असून त्यांनी त्यांच्या करियरकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे. त्यांच्या नात्याला ऑफिशियल करण्याची सध्या त्यांना गरज वाटत नाहीये. त्यामुळे सध्या तरी त्यांच्या लग्नाची अनाऊन्समेंट होण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीयेत.

Web Title: Shibani dandekar and farhan akhtar get trolled gda