ताई, चूक मान्य कर..., शर्लिन चोप्राचा शिल्पा शेट्टीला सल्ला, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 15:23 IST2021-08-30T15:22:51+5:302021-08-30T15:23:28+5:30

नुकताच शर्लिनने इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत शर्लिनने थेट शिल्पावर निशाणा साधला.

sherlyn chopra target shilpa shetty by haring video in raj kundra pornography case | ताई, चूक मान्य कर..., शर्लिन चोप्राचा शिल्पा शेट्टीला सल्ला, शेअर केला व्हिडीओ

ताई, चूक मान्य कर..., शर्लिन चोप्राचा शिल्पा शेट्टीला सल्ला, शेअर केला व्हिडीओ

ठळक मुद्देसुत्रांच्या माहितीनुसार शर्लिनने राज कुंद्राची मालकी असलेल्या आर्म्सप्राइम मीडियासोबत करार केला होता. भारताबाहेरील कंपन्यांच्या काही अ‍ॅप्ससाठी अश्लील कंटेंट उपलब्ध करुन देण्यासाठीचा करार करण्यात आला होता.

गेल्या 19 जुलैला मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला (Raj Kundra) पोर्नोग्राफी प्रकरणी (Pornography Case) अटक केली. तेव्हापासून राज तुरूंगात आहे. अद्याप त्याला जामीन मिळालेला नाही. साहजिकच शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) चिंता वाढल्या आहेत. अशात सोशल मीडिया सुद्धा शिल्पाच्या अडचणींमध्ये भर घालताना दिसतोय. राज कुंद्राला अटक झाली तेव्हापासून अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह झाली आहे आणि आता तिने शिल्पा शेट्टीवर निशाणा साधला आहे.
नुकताच शर्लिनने इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत शर्लिन खूप काही बोलली. पण यावेळी तिच्या निशाण्यावर राज कुंद्रा नाही तर शिल्पा शेट्टी दिसली. हा व्हिडीओ शेअर करताना शर्लिनने थेट शिल्पाचे नाव घेतले.

‘हाय शिल्पा ताई..., माझी विनंती आहे की पीडित मुलींबद्दल सहानुभूती बाळगावी. चूक मान्य केल्याने कोणी लहान होत नाही,’असे शर्लिनने लिहिले आहे.  ‘ राणी लक्ष्मीबाई यांच्या गोष्टी ऐकतांना तुला अभिमान वाटतो, असे नुकतेच तू एका रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर बोललीस.  पण  आता ज्या मुली न्यायासाठी वेग-वेगळ्या पोलीस स्थानकात जावून जबाब नोंदवत आहेत. त्यांचे काय?’असा प्रश्न शर्लिन चोप्राने व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार शर्लिनने राज कुंद्राची मालकी असलेल्या आर्म्सप्राइम मीडियासोबत करार केला होता. भारताबाहेरील कंपन्यांच्या काही अ‍ॅप्ससाठी अश्लील कंटेंट उपलब्ध करुन देण्यासाठीचा करार करण्यात आला होता. शर्लिन  सेमी पोर्नोग्राफिकच्या आधारावर एक अ‍ॅप चालवत होती. हे पार्टटाइम काम  चालत नसल्यामुळे तिने राजशी संपर्क केला होता. राज कुंद्रासोबत करार करुन 50 टक्के नफ्याच्या वाट्यावर दोघांमध्ये करार झाला होता. राज कुंद्राने स्वत: या करारावर स्वाक्षरी केली होती. 
जून 2019 आणि जुलै 2020 दरम्यान दोघांनी खूप चांगली कमाई केली. पण करारानुसार पैसे आपल्याला मिळत नसल्याचे शर्लिनच्या लक्षात आले आणि तिने एका वषार्नंतर करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी 2021 नंतर शर्लिनने दिलेल्या जबाबात तिने राज कुंद्राने आपल्याला पूर्णपणे पॉर्न इंडस्ट्रीमध्ये ढकलल्याचा आरोप केला होता.

Web Title: sherlyn chopra target shilpa shetty by haring video in raj kundra pornography case