'तु मेरा है मेरा ही रहेगा', अवॉर्ड घेताना शहनाझ गिल भावुक, फॅन्सच्या डोळ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 11:38 AM2022-11-20T11:38:41+5:302022-11-20T11:40:32+5:30

बिग बॉस १३ मध्ये शहनाज आणि सिद्धार्थ शुक्ला या जोडीचे लाखो चाहते आहेत. या जोडीने त्यांच्या क्युट अंदाजातुन, त्यांच्या छोट्या छोट्या भांडणातुन फॅन्सला अक्षरश: वेड लावले होते.

shehnaaz-gill-dedicates-award-to-siddharth-shukla-in-dubai-says-tu-mera-hai-mera-hi-rahega | 'तु मेरा है मेरा ही रहेगा', अवॉर्ड घेताना शहनाझ गिल भावुक, फॅन्सच्या डोळ्यात पाणी

'तु मेरा है मेरा ही रहेगा', अवॉर्ड घेताना शहनाझ गिल भावुक, फॅन्सच्या डोळ्यात पाणी

googlenewsNext

बिग बॉस १३ मध्ये शहनाज आणि सिद्धार्थ शुक्ला या जोडीचे लाखो चाहते आहेत. या जोडीने त्यांच्या क्युट अंदाजातुन, त्यांच्या छोट्या छोट्या भांडणातुन फॅन्सला अक्षरश: वेड लावले होते. त्यांच्यासारखी इतकी गोड जोडी इतर कोणत्या सीझनमध्ये कदाचितच दिसली असेल. मात्र कोणाला माहित होते की एक दिवस ही जोडी तुटेल. सिद्धार्थच्या मृत्युनंतर शहनाझ कित्येक दिवस स्वत:ला सावरु शकली नाही. मात्र सिद्धार्थच्याआठवणी सोबत घेत ती पुन्हा अॅक्टिव्ह झाली. तिने काम करायला सुरुवात केली. दरम्यान नुकत्याच झालेल्या एका अवॉर्ड शो मध्ये शहनाझने तिला मिळालेला अवॉर्ड सिद्धार्थ शुक्ला ला डेडिकेट केला आहे.

दुबईमध्ये नुकताच फिल्मफेअर मिडल ईस्ट अचीव्हर्स अवॉर्ड पार पडला. तमन्ना भाटिया, राखी सावंत, मानुषी छिल्लर, अर्जुन कपुर, मनीष पॉल, भारती सिंह, कनिका कपुर, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, रणवीर सिंह, जान्हवी कपुर, हेमा मालिनी, गोविंदा, इशिता दत्ता, वत्सल सेठ सारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. तर या शोमध्ये पंजाबची कॅटरिना कैफ शहनाझ गिल ला अवॉर्ड देण्यात आला. अवॉर्ड मिळाल्यानंतर तिने स्पीच मध्ये म्हणले, हा अवॉर्ड मी कुटुंबीय, मित्रपरिवार यापैकी कोणालाच डेडिकेट करणार नाही कारण ही माझी मेहनत आहे. तु मेरा है और मेरा ही रहेगा, एका व्यक्तीचे मी आभार मानेन ज्याने मला इथपर्यंत पोहचवले. सिद्धार्थ शुक्ला दिस इज फॉर यु.'

सिद्धार्थला अवॉर्ड डेडिकेट करताना शहनाझ भावुक झाली. तर चाहत्यांनी एकच आवाज करत शहनाझ ला दाद दिली. यावर फॅन्स ही भावुक झाले आहेत. या व्हिडिओच्या कमेंट मध्ये फॅन्स प्रतिक्रिया देत आहेत. आज सिद्धार्थ असता तर तिथेच बसुन हसत असला असता. आनंदाने लाजत असता. असे म्हणत फॅन्स सिद्धार्थच्या आठवणीत भावुक झाले आहेत. 

Web Title: shehnaaz-gill-dedicates-award-to-siddharth-shukla-in-dubai-says-tu-mera-hai-mera-hi-rahega

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.