शेफाली जरीवालाच्या निधनाबाबत ऐकताच प्रियांका चोप्राला बसला मोठा धक्का, म्हणाली- "ती खूप तरुण होती..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:00 IST2025-06-30T13:00:20+5:302025-06-30T13:00:52+5:30
शेफाली जरीवालाच्या आकस्मिक निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रालाही शेफालीच्या निधनाबाबत समजताच धक्का बसला.

शेफाली जरीवालाच्या निधनाबाबत ऐकताच प्रियांका चोप्राला बसला मोठा धक्का, म्हणाली- "ती खूप तरुण होती..."
Shefali Jariwala Death: अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. शुक्रवारी(२७ जून) शेफालीला हृदयविकाराचा झटका आला. तिला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शेफाली जरीवालाच्या आकस्मिक निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रालाही शेफालीच्या निधनाबाबत समजताच धक्का बसला.
प्रियांकाने शेफालीसाठी तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कुटुंबीयांसाठी प्रार्थना केली आहे. "मला धक्का बसला आहे. ती खूप तरूण होती. पराग आणि कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे", असं प्रियांकाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रियांकाने शेफालीचा सुंदर फोटो शेअर केला आहे. शेफाली या जगात नाही यावर प्रियांकाचाही विश्वात बसत नाहीये.
शेफाली जरीवालाला काटा लगा गाण्यामुळे प्रसिद्धी मिळाली होती. शेफालीने अनेक मालिका, सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं होतं. शनिवारी मुंबईत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेफालीच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तिचा पती पराग त्यागीसह काहींचा जबाब नोंदवला आहे. शेफाली गेल्या काही वर्षांपासून अँटी एजिंगची ट्रीटमेंट घेत असल्याचं समोर आलं आहे.