Aaditi Pohankar : ‘आश्रम 3’ची ‘पम्मी पहलवान’ आहे भलतीच बोल्ड; पाहा, तिच्या नव्या सीरिजचा ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 15:29 IST2022-06-09T15:21:05+5:302022-06-09T15:29:03+5:30
Aashram 3 : ‘आश्रम 3’ या सीरिजमध्ये पम्मी पहलवान अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती पोहनकरचा (Aaditi Pohankar) बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. आता अदितीची आणखी एक बोल्ड सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.

Aaditi Pohankar : ‘आश्रम 3’ची ‘पम्मी पहलवान’ आहे भलतीच बोल्ड; पाहा, तिच्या नव्या सीरिजचा ट्रेलर
बॉबी देओलची ‘आश्रम 3’ ( Aashram 3) ही वेबसीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. या सीरिजमधील पम्मी पहलवानचीही (Pammi Aashram 3) चांगलीच चर्चा होतेय. प्रकाश झा दिग्दर्शित या सीरिजमध्ये पम्मी पहलवान अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती पोहनकरचा (Aaditi Pohankar) बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. आता अदितीची आणखी एक बोल्ड सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. ‘शी’ ' (Shee) या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये अदिती पुन्हा एकदा बोल्ड रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
‘शी-2’चा ' (Shee 2) ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या सीरिजमध्ये अदितीने भूमिका परदेशी उर्फ भूमीची भूमिका साकारली आहे. ही सीरिज येत्या 17 जूनला नेटफ्लिक्सवर रिलीज होतेय. ‘शी’च्या पहिल्या सीझनमध्येही अदितीने जबरदस्त इंटिमेट सीन्स दिले होते. आता दुसऱ्या सीझनमध्येही तिने त्यापेक्षा बोल्ड सीन्स दिले आहेत.
ही सीरिज इम्तियाज अली यांनी प्रोड्यूस केली असून आरिफ अलीने दिग्दर्शित केली आहे. ‘शी’मध्ये अंडर कव्हर पोलिस कॉन्सटेबल भूमिका परदेशीची कथा दाखवली आहे. भूमिकाला एका ड्रग्ज माफिया गँगमध्ये सामील होण्यासाठी तयार केलं जातं आणि यानंतर तिचं आयुष्यच बदलून जातं. एका क्षणी ड्रग्ज माफियासमोर तिला आपलं सत्य सांगावं लागतं. पहिला सीझन याच वळणावर संपला होता. आता दुसऱ्या सीझनमध्ये काय असणार? भूमीच्या कहाणीचा अंत होणार की नवी सुरूवात होणार? हे या सीझनमध्ये बघायला मिळणार आहे.
‘आश्रम 3’मध्ये अदिती पोहनकरच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. लवकरच या सीरिजचा चौथा भागही येणार आहे आणि त्यातही अदिती लक्षवेधी भूमिका साकारताना दिसणार आहे. अदिती पोहनकरने आजवर हिंदी, मराठी, तमिळ अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. अदिती पोहनकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर अदितीचे ४ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ‘लय भारी’ आणि ‘लव्ह सेक्स और धोका’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये आदितीने काम केले आहे.