शर्मिला टागोर यांनी दाखल केली तक्रार..वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 10:14 IST2017-08-14T04:44:01+5:302017-08-14T10:14:01+5:30
बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी आपल्या भोपाळमधल्या शाही संपत्ती बळकवण्याचा प्रयत्न केला संदर्भात तक्रार दाखल केली आहे. शर्मिला टागोर ...

शर्मिला टागोर यांनी दाखल केली तक्रार..वाचा सविस्तर
ब लिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी आपल्या भोपाळमधल्या शाही संपत्ती बळकवण्याचा प्रयत्न केला संदर्भात तक्रार दाखल केली आहे. शर्मिला टागोर यांचे कोह-ए-फिजा परिसरात खानदानी घर आहे. या घरावर अवैध प्रकाराने हक्क दाखवल्या संदर्भातला गुन्हा त्यांनी दाखल केला आहे. शार्मिला टागोर यांच्या तक्रारीवरुन भोपाळ पोलिसांनी या घरात राहणाऱ्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. शर्मिला टागोर यांचे पती मंसूर अली खान पटौदी भोपाळच्या शाही खानदानचे राजकुमार होते. ते भोपाळचे शेवटचे नवाब हामीदुल्ल खान यांचे पणतु आहेत. नवाब हमीदुल्ल खान यांनी आपली सगळी संपत्ती आपल्या मुलीच्या म्हणजेच मंसूर अली खान पटौदी यांच्या आईच्या नावावर केली होती. त्यामुळे आईनंतर त्याचे सगळी मालकी हक्क मंसूर अली खान पटौदी यांच्याकडे आले.
शर्मिला यांचे म्हणणे आहे माझे पती नवाब मंसूर अली खान पटौदी भोपाळचे राजकुमार होते. त्यामुळे त्यांच्या नावावर असलेल्या सगळ्या संपत्तीचे वारसदार मी आणि माझा मुलगा सैफ अली खान आहे. यासंदर्भात भोपाळचे तहशीलदार अजय प्रताप सिंग पटेल म्हणाले शर्मिला टागोर यांनी काही महिनेआधीच कोह-ए-फिजा परिसरात असलेल्या घरावर आपला मालकी हक्क सांगितला आहे आणि लवकरात लवकर याला खाली करण्यास सांगितले आहे. शर्मिला टागोर यांनी या घरावर मालकी हक्क दाखवल्यानंतर आम्ही ते घर खाली केले आहे. तसेच त्या घरात राहणाऱ्या दोन जणांना नोटीस बजावली आहे.
सैफ अली खान आपली बेगम करिना कपूर खान आणि मुलगा तैमूरसोबत स्वित्झर्लंडमध्ये व्हेकेशन एन्जॉय करुन नुकताच परतला आहे.