तेजश्री प्रधानने पहिल्याच हिंदी चित्रपटात दिला किसिंग सीन, पाहा बबलू बॅचलरचा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 11:14 IST2020-02-11T11:07:11+5:302020-02-11T11:14:46+5:30

'बबलू बॅचलर' च्या ट्रेलरमध्ये आपल्याला चक्क तेजश्री प्रधान आणि शर्मन जोशी यांचा किसिंग सीन पाहायला मिळत आहे.

sharman joshi and tejashree pradhan starter babloo bachelor trailer | तेजश्री प्रधानने पहिल्याच हिंदी चित्रपटात दिला किसिंग सीन, पाहा बबलू बॅचलरचा ट्रेलर

तेजश्री प्रधानने पहिल्याच हिंदी चित्रपटात दिला किसिंग सीन, पाहा बबलू बॅचलरचा ट्रेलर

ठळक मुद्दे'बबलू बॅचलर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या ट्रेलरमध्ये आपल्याला चक्क तेजश्री प्रधान आणि शर्मन जोशी यांचा किसिंग सीन पाहायला मिळत आहे.

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा दोन्ही ठिकाणी तेजश्री प्रधानने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. छोट्या आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने आपली छाप सोडली आहे. हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा आहेत. आता तेजश्रीने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली असून ती लवकरच बबलू बॅचलर या चित्रपटात शर्मन जोशीसोबत झळकणार आहे.

तेजश्रीने बबलू बॅचलर या तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. शर्मन जोशी आणि तेजश्रीने याआधी एका नाटकात काम केले होते. या नाटकाला रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यामुळे आता मोठ्या पडद्यावर त्या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'बबलू बॅचलर' सिनेमा 20 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'बबलू बॅचलर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या ट्रेलरमध्ये आपल्याला चक्क तेजश्री प्रधान आणि शर्मन जोशी यांचा किसिंग सीन पाहायला मिळत आहे. पहिल्याच चित्रपटात तेजश्रीने किसिंग सीन दिल्याने याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

तेजश्रीने होणार सून मी या घरची या मालिकेनंतर चित्रपटात आणि नाटकात काम केलं. त्यामुळे छोट्या पडद्याला काही काळासाठी तिने रामराम ठोकला होता. पण आता ती प्रेक्षकांना 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळतेय.

Web Title: sharman joshi and tejashree pradhan starter babloo bachelor trailer