'शार्क्स'ने अमिताभ बच्चन यांना 100 कोटींच्या बिझनेस दिली ऑफर, बिग बींनी लगेचच साइनिंग अमाउंट मागितली, नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 16:49 IST2022-12-21T16:43:18+5:302022-12-21T16:49:42+5:30

'शार्क' शो लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. शार्क टँक इंडिया 2 जानेवारी 2023 पासून पुन्हा सुरू होणार आहे.अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर शो पाहण्यासाची मोठी संधी मिळणार आहे.

shark tank sharks 100cr deal amitabh bachchan business plan kaun banega crorepati | 'शार्क्स'ने अमिताभ बच्चन यांना 100 कोटींच्या बिझनेस दिली ऑफर, बिग बींनी लगेचच साइनिंग अमाउंट मागितली, नंतर...

'शार्क्स'ने अमिताभ बच्चन यांना 100 कोटींच्या बिझनेस दिली ऑफर, बिग बींनी लगेचच साइनिंग अमाउंट मागितली, नंतर...

'शार्क' शो लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. शार्क टँक इंडिया 2 जानेवारी 2023 पासून पुन्हा सुरू होणार आहे.अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर शो पाहण्यासाची मोठी संधी मिळणार आहे. ग्यान के मंच केबीसीच्या शेवटच्या आठवड्यात, व्यवसाय जगतातील मोठे शार्क क्विझ शोची शान वाढवतील. अमिताभ बच्चन यांचा शो धमाल करणार असेल. या शो मध्ये अमिताभ यांनी स्वतःच्या व्यवसायाची कल्पना मांडली आहे. 

अमिताभ बच्चन यांनी एबी टिश्यूची बिझनेस आयडिया देशातील टॉप व्यवसाय असणाऱ्या शार्क यांच्यासमोर मांडली. या उत्पादनाची खासियत सांगायला अमिताभ बच्चन थोडेही चुकले नाहीत. यात अमिताभ बच्चन यांना शार्क यांच्याकडून मोठी डील मिळाली आहे. 'शार्क' यांना बिग बींची ही कल्पना आवडली, यांनी बीग बींसमोर 100 कोटींची डील ठेवली. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी लगेचच शार्क यांच्याकडून साईनिंग अमाउंटची मागणी केली आहे. 

गोविंदाला होती जेम्स कॅमेरूनच्या Avatar ची ऑफर, 'या' कारणामुळे सारं काही फिस्कटलं...

सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये  अमिताभ बच्चन यांनी आपल्या व्यवसायाची कल्पना मांडली आहे. 'आम्ही खास महिलांसाठी एबी टिश्यू आणले आहेत. या उत्पादनाची पहिल्या फेरीची चाचणीही झाली आहे. तुम्ही आमच्या या उत्पादनात गुंतवणूक करू शकाल की नाही? बिग बींच्या बिझनेस प्रपोजलला उत्तर देताना, अनुपम मित्तल म्हणतात - जर एबी टिश्यू तुमच्या नावावर बाजारात विकला गेला तर आम्ही नक्कीच 100 कोटींची गुंतवणूक करू. यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक आवाहन केले आहे. यात ते म्हणतात- सर, छोटी गोष्ट आहे, आता 100 कोटींमध्ये 25% साइनिंग अमाउंट मिळेल का? KBC चा हा प्रोमो चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे. 

टीव्हीवरील लोकप्रिय शो शार्क टँक इंडियाचे पुनरागमन होणार आहे. यावेळी अश्नीर ग्रोव्हर शोचा भाग नाही. शार्क टँकचा शेवटचा सीझन सुपर डुपर हिट ठरला होता. कौन बनेगा करोडपतीचा हा 14 वा सीझन सुरू आहे. दरवेळेप्रमाणे यावेळीही अमिताभचा शो चाहत्यांच्या पसंतीस उतरला. आता प्रतीक्षा आहे कौन बनेगा करोडपती 15 ची.

Web Title: shark tank sharks 100cr deal amitabh bachchan business plan kaun banega crorepati