"तुम्ही महाराजांच्या नावाचा वापर करुन.."; 'तान्हाजी'मध्ये छत्रपती शिवराय साकारणाऱ्या शरद केळकरची खंत

By देवेंद्र जाधव | Updated: February 27, 2025 10:11 IST2025-02-27T10:10:44+5:302025-02-27T10:11:23+5:30

शरद केळकरने तान्हाजी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. त्यानंतर शरदने त्याला आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (sharad kelkar)

sharad kelkar talk about after life played chhatrapati shivaji maharaj role in tanhaji | "तुम्ही महाराजांच्या नावाचा वापर करुन.."; 'तान्हाजी'मध्ये छत्रपती शिवराय साकारणाऱ्या शरद केळकरची खंत

"तुम्ही महाराजांच्या नावाचा वापर करुन.."; 'तान्हाजी'मध्ये छत्रपती शिवराय साकारणाऱ्या शरद केळकरची खंत

'तान्हाजी' (tanhaji movie) सिनेमा सर्वांना आठवत असेलच. या सिनेमात अजय देवगणने (ajay devgn) सुभेदार तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली होती. तर अजयसोबत सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता शरद केळकर (sharad kelkar) दिसला होता. शरद केळकरने साकारलेली छत्रपती शिवरायांची भूमिका आजही लोकांच्या मनात आहे. ही भूमिका साकारल्यानंतर शरदचं आयुष्य कसं बदललं याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला आहे. काय म्हणाला शरद?

शरद केळकरने व्यक्त केली ही खंत

शरद केळकरने डिजीटल कॉमेंट्रीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "हे जनतेकडून मला मिळालेलं प्रेम आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण, तान्हाजी रिलीज झाल्यानंतर मला असंख्य इव्हेंट्समधून, असंख्य ठिकाणी आमंत्रण मिळालंय. त्यांची एकच विनंती असते की, महाराजांच्या वेशभुषेत यावं. त्यामुळे अशा ठिकाणी आजवर कधीच गेलो नाही. मी स्पष्ट नकार दिलाय. माझा नियम आहे की, ज्या व्यक्तीमुळे मला इंडस्ट्रीत इतका सन्मान मिळालाय त्याचा मला स्वतःसाठी वापर नाही करायचा.

"स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करणं मला कधीच कळलं नाही. सर आमच्या सिनेमात महाराजांचे ६ सीन्स आहेत तुम्ही कराल का? अशी विचारणा होते. मी नकार देतो. मला असं नाही करायचं. कारण तुम्ही फक्त महाराजांचा वापर करु इच्छिता. त्यांच्या नावाचा उपयोग करुन तुम्ही त्या सिनेमाला मोठं करायचा प्रयत्न करत आहात. तुम्ही फक्त महाराजांवर सिनेमा बनवा मी नक्कीच करेन." अशाप्रकारे 'तान्हाजी' सिनेमातील भूमिका गाजल्यानंतरही शरद केळकरने इतर सिनेमांमध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका का साकारली नाही, यावर त्याचं मत व्यक्त केलंय.

Web Title: sharad kelkar talk about after life played chhatrapati shivaji maharaj role in tanhaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.