शरद केळकरच्या लग्नाला १६ वर्षे पूर्ण, त्याची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 05:11 PM2021-06-03T17:11:13+5:302021-06-03T17:12:11+5:30

शरद केळकरची पत्नी हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Sharad Kelkar has been married for 16 years and his wife is also a famous actress | शरद केळकरच्या लग्नाला १६ वर्षे पूर्ण, त्याची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

शरद केळकरच्या लग्नाला १६ वर्षे पूर्ण, त्याची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

googlenewsNext

हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता शरद केळकरने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. फार कमी जणांना माहित आहे की शरदची पत्नी किर्ती गायकवाड हीदेखील अभिनेत्री आहे. तिने अनेक हिंदी मालिकेत काम केले आहे. शरद केळकर आणि किर्ती गायकवाड यांच्या लग्नाचा आज १६वा वाढदिवस साजरा करत आहेत. 


शरद केळकरने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर त्यांच्या लग्नातला फोटो शेअर करत लिहिले की, किर्तीला लग्नाच्या १६व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


शरद केळकरने आणखी एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की बीवी हो तो ऐसी. हॅपी अॅनिव्हर्सरी बेबी. या व्हिडीओत किर्ती तुमसे मिलकर हे गाणे गाताना दिसते आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 


शरद केळकर आणि किर्ती गायकवाडचे लग्न ३ जून, २००५ साली महाराष्ट्रीयन पद्धतीने झाले. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव किशा आहे.

किर्ती आणि शरदने ‘सात फेरे’ या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम फुलू लागले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. किर्ती व शरद नेहमी एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. 

View this post on Instagram

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar)


किर्तीने सात फेरे, छोटी बहू, ससूराल सिमर का या मालिकेत काम केले आहे. नच बलिए या रिअ‍ॅलिटी डान्स शोमध्येही ती झळकली आहे.

तर शरद केळकरने मराठी व हिंदी चित्रपटात विविध भूमिका केल्या आहेत. ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद झळकला होता. त्याने साकारलेल्या या भूमिकेने तर रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला होता.

त्यानंतर लक्ष्मी बॉम्ब चित्रपटात त्याने साकारलेल्या तृतीयपंथियाची भूमिका देखील चाहत्यांना खूप भावली होती.

Web Title: Sharad Kelkar has been married for 16 years and his wife is also a famous actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.