एक दिवस त्याला भेटण्याची संधी मिळो...! शंकर महादेवनही पडले या चिमुरड्या संगीत शिक्षकाच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 11:46 IST2021-02-21T11:45:35+5:302021-02-21T11:46:06+5:30

सुप्रसिद्ध संगीतकार व गायक शंकर महादेवन सध्या एका चिमुकल्याच्या प्रेमात पडले आहेत. होय, या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून ते असे काही भारावलेत की, त्यांनी थेट एक दिवस त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

shankar mahadevan shared a video of the little boy singing | एक दिवस त्याला भेटण्याची संधी मिळो...! शंकर महादेवनही पडले या चिमुरड्या संगीत शिक्षकाच्या प्रेमात

एक दिवस त्याला भेटण्याची संधी मिळो...! शंकर महादेवनही पडले या चिमुरड्या संगीत शिक्षकाच्या प्रेमात

ठळक मुद्देशंकर महादेवन यांनी तीन तासांपूर्वी हा व्हिडीओ शेअर केला. अवघ्या तीन तासात हा व्हिडीओ 90 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

आपल्या सुरेल स्वरांनी रसिकांना मनावर राज्य करणारे सुप्रसिद्ध संगीतकार व गायक शंकर महादेवन सध्या एका चिमुकल्याच्या प्रेमात पडले आहेत. होय, या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून ते असे काही भारावलेत की, त्यांनी थेट एक दिवस त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचा मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ  शंकर महादेवन  यांनी नुकतीच शेअर केला आहे. या व्हिडीओत एक चिमुकला मुलगा एका मुलीला गाणे शिकवतोय. या मुलाचा आवाज आणि त्याने छेडलेले सूर ऐकून शंकर महादेवनही आवाक झाले. 
‘ मी आतापर्यंत पाहिलेला सर्वात गोड आणि सर्वात भारी संगीत शिक्षक. त्याचा आवाज अगदी नैसर्गिक आहे आणि जन्मत:च त्याला हा आवाज गिफ्ट मिळाला आहे,’ असे लिहित शंकर महादेवन यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

‘गाणं शिकवताना त्याच्या चेह-यावर असणारा आनंद आणि उत्साह पाहा. त्याचा हाच उत्साह पाहून समोर बसलेली चिमुरडीही गाणं शिकण्याचा आनंद घेत आहे. एक दिवस त्याला भेटण्याची संधी नक्की मिळो,अशी आशा करतो, ’ असेही त्यांनी लिहिले आहे. 
शंकर महादेवन यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओतील चिमुकला संगीत शिक्षक कोण, कुठला याबद्दल अद्याप माहिती नाही. व्हिडीओ पाहून तरी तो एखाद्या सामान्य कुटुंबातील वाटतोय. शंकर महादेवन सारख्या दिग्गजाकडून कौतुकाची थाप मिळवणाºया या चिमुरड्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. 
शंकर महादेवन यांनी तीन तासांपूर्वी हा व्हिडीओ शेअर केला. अवघ्या तीन तासात हा व्हिडीओ 90 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी मुलाच्या आवाजाचं कौतुक केलं आहे. काहींनी तर हा मुलगा भविष्यातील शंकर महादेवन असल्याचे म्हणत त्याच्या या गाण्याला पसंती दर्शवली आहे.

Web Title: shankar mahadevan shared a video of the little boy singing