VIDEO : जीजू जेल में और साली..., सलूनमध्ये गेल्यामुळे ट्रोल झाली राज कुंद्राची मेव्हणी शमिता शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 10:37 IST2021-08-03T10:34:50+5:302021-08-03T10:37:15+5:30

VIDEO : राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर ट्रोल होतेय. अगदी शिल्पाची बहीण शमिता शेट्टी ही सुद्धा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

shamita shetty troll for going salon amid raj kundra pornography case | VIDEO : जीजू जेल में और साली..., सलूनमध्ये गेल्यामुळे ट्रोल झाली राज कुंद्राची मेव्हणी शमिता शेट्टी

VIDEO : जीजू जेल में और साली..., सलूनमध्ये गेल्यामुळे ट्रोल झाली राज कुंद्राची मेव्हणी शमिता शेट्टी

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी शमिताने बहीण शिल्पासाठी पोस्ट लिहिली होती.  हंगामा 2 या चित्रपटासाठी तिने शिल्पाला शुभेच्छा देत या कठीण काळात धीर ठेवण्याचा सल्ला दिला होता.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती व उद्योगपती राज कुंद्रा सध्या तुरुंगात आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात (Raj Kundra Case) गेल्या 19 जुलैला राजला अटक झाली. 27 जुलैला कोर्टाने राज कुंद्राची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर ट्रोल होतेय. अगदी शिल्पाची बहीण शमिता शेट्टी (Shamita Shetty) ही सुद्धा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. अलीकडे शमिता सलून बाहेर दिसली आणि लोकांनी पुन्हा एकदा तिला ट्रोल करणे सुरू केले.
‘मोहब्बतें’ फेम शमिता सोमवारी मुंबईच्या जुहू भागातील एका सलूनमध्ये जाताना दिसली. डेनिम शॉट्स आणि टी-शर्ट घातलेल्या शमिताचा सलूनमध्ये जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायल झाला झाला. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने हा व्हिडीओ शेअर केला.

  व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी शमितावर नको त्या कमेंट्स केल्या. जीजू जेलमध्ये आहे आणि मेव्हणी पार्लरमध्ये जातेय, असे एका युजरने लिहिले.  जीजू जेलमध्ये असल्याने हिला काहीही फरक पडत नाही, अशी कमेंट करत एका युजरने शमिताला ट्रोल केले.

चला, जीजूच्या बहाण्याने का होईना हिला पब्लिसिटी मिळतेय, अशी कमेंट एका युजरने केली. तर अन्य एका युजरने ‘जान जाये पर स्टाईल न जाये,’ असे म्हणत शमिताला लक्ष्य केले.
राज कुंद्राच्या अटकेनंतर काल पहिल्यांदा शिल्पा शेट्टीने एक स्टेटमेंट जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली होती. मी या प्रकरणावर गप्प आहे आणि गप्पच राहणार आहे. पण कृपया आमच्या प्रायव्हर्सीचा आदर करा. एक आई या नात्याने माझ्या मुलांची प्रायव्हर्जी जपा, अशी विनंती तिने या स्टेटमेंटमध्ये केली होती.
काही दिवसांपूर्वी शमिताने बहीण शिल्पासाठी पोस्ट लिहिली होती.  हंगामा 2 या चित्रपटासाठी तिने शिल्पाला शुभेच्छा देत या कठीण काळात धीर ठेवण्याचा सल्ला दिला होता. ‘ हंगामा 2 साठी खूप साºया शुभेच्छा मुंकी... मला माहिती आहे या सिनेमासाठी तू खूप मेहनत घेतली होतीस. तुला खूप सारे प्रेम आणि मी तुझ्यासोबत कायम आहे. तू आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेस. या सगळ्या अनुभवांमुळे तू खूप कणखर झाली आहेस. हा कठीण काळसुद्धा जाईल, विश्वास ठेव,’ असे शमिताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलेहोते.
 

Web Title: shamita shetty troll for going salon amid raj kundra pornography case