शक्ती मोहनचा बॉलिवूड डेब्यू ठरला! ‘एबीसीडी 3’मध्ये लागली वर्णी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 10:15 IST2019-01-15T10:15:39+5:302019-01-15T10:15:53+5:30

‘एबीसीडी 3’मध्ये पुन्हा एकदा वरूण धवन व श्रद्धा कपूरची वर्णी लागली आहे. आता या चित्रपटात आणखी एक नवा चेहरा दिसणार आहे. हा चेहरा कुणाचा तर शक्ती मोहन

shakti mohan to make her bollywood debut in the abcd 3 | शक्ती मोहनचा बॉलिवूड डेब्यू ठरला! ‘एबीसीडी 3’मध्ये लागली वर्णी!!

शक्ती मोहनचा बॉलिवूड डेब्यू ठरला! ‘एबीसीडी 3’मध्ये लागली वर्णी!!

ठळक मुद्देरेमो डिसूजासोबत ‘डान्स प्लस 4’ हा डान्स रिअ‍ॅलिटी शो जज करत असताना शक्तीला हा चित्रपट मिळाला. रेमोने स्वत: शक्तीला या चित्रपटाची आॅफर दिली.

दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर रेमो डिसूजा याची डान्स फ्रेन्चाइजी ‘एबीसीडी’ या चित्रपटाचा तिसरा भाग कायम चर्चेत आहे. ‘एबीसीडी 3’मध्ये पुन्हा एकदा वरूण धवनश्रद्धा कपूरची वर्णी लागली आहे. आता या चित्रपटात आणखी एक नवा चेहरा दिसणार आहे. हा चेहरा कुणाचा तर शक्ती मोहन हिचा. होय, कोरिओग्राफर शक्ती मोहन ‘एबीसीडी 3’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. शक्तीच्या चाहत्यांसाठी ही नव्या वर्षाची ट्रिट म्हणायला हवी.


खुद्द शक्तीने याबद्दलची माहिती दिली. खरे तर मला अ‍ॅक्टिंग करताना फार मज्जा येत नाही. पण या प्रोजेक्टबद्दल मी सुपर एक्साइटेड आहे. कारण ही एक डान्स मुव्ही आहे आणि मी यात माझा मेंटर रेमो डिसूजासोबत काम करतेय, असे ती म्हणाली. ‘एबीसीडी 3’चे पहिले शेड्यूल लंडनमध्ये होणार आहे. त्यामुळे शक्ती लवकरच लंडनला रवाना होणार आहे.


रेमो डिसूजासोबत ‘डान्स प्लस 4’ हा डान्स रिअ‍ॅलिटी शो जज करत असताना शक्तीला हा चित्रपट मिळाला. रेमोने स्वत: शक्तीला या चित्रपटाची आॅफर दिली. ‘एबीसीडी 3’ हा एक डान्स बेस्ट चित्रपट असल्याने शक्ती या चित्रपटात अगदी फिट बसली. मुळात ‘डान्स प्लस’ या शोच्या स्पर्धकांना घेऊनच रेमोने ‘एबीसीडी’ हा चित्रपट साकारला होता. रेमोच्या या चित्रपटात सलमान युसूफशिवाय धर्मेश येलंडे, प्रिन्स, पुनीश पाठक, मोहिना सिंह महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. पहिला भाग हिट झाल्यानंतर रेमो या चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन आला आणि आता ‘एबीसीडी 3’ची तयारी सुरु झाली आहे.


‘एबीसीडी 3’मध्ये आधी वरूणसोबत कॅटरिना कैफ दिसणार होती. पण कॅट सध्या सलमानच्या ‘भारत’मध्ये बिझी असल्याने तिने या चित्रपटाला नकार दिला आणि हा चित्रपट श्रद्धा कपूरच्या झोळीत पडला.

Web Title: shakti mohan to make her bollywood debut in the abcd 3