शाहरुख खानला का आवडते पँट काढायला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 11:12 IST2017-02-04T05:42:55+5:302017-02-04T11:12:55+5:30

शाहरुख खान म्हणजे सरप्राईज बॉक्स आहे. त्याच्या प्रत्येक मुलाखतीमधून आपल्याला त्याच्याबद्दल काही तरी नवीन माहिती मिळते. आता हेच पाहा ...

Shahrukh Khan's favorite pants to draw? | शाहरुख खानला का आवडते पँट काढायला?

शाहरुख खानला का आवडते पँट काढायला?

हरुख खान म्हणजे सरप्राईज बॉक्स आहे. त्याच्या प्रत्येक मुलाखतीमधून आपल्याला त्याच्याबद्दल काही तरी नवीन माहिती मिळते. आता हेच पाहा ना, या सुपरस्टारला शूटींग सुरू असताना जर कोणी ‘पॅक अप’ म्हटले की, लगेच पँट काढायला आवडते.

होय, तुम्ही बरोबर वाचले.

सेटवर पॅक अप म्हटल्यावर किंग खान लगेच पँट काढून मोकळा होतो. नुकतेच एका कार्यक्रमात त्याने हा ‘अजब’ खुलासा केला. तो म्हणाला, ‘शूटींग करत असताना जेव्हा पॅक अप होते तेव्हा मी लगेच व्हॅनिटीमध्ये जाऊन पँट काढून बसतो. तुम्हाला ऐकायला थोडे विचित्र वाटेल पण हे खरे आहे. मला फक्त जीन्स घालायला आवडते. चित्रपटात मला सूट-पँट घालावी लागते. त्यामुळे जसे कोणी ‘पॅक अप’ म्हणतो मी पँट काढून मोकळा होतो.’

srk pants off
पँट्स आॅफ: आमिर खान, गुलशन ग्रोव्हर आणि शाहरुख खान

बरं एवढेच नाही. शाहरुखला व्यवस्थित विंचरलेले केसदेखील आवडत नाहीत. केसांशी अतीव प्रेम करणाऱ्या एसआरकेला त्याचे केस अस्ताव्यस्त आवडतात. त्यामुळे पॅक अपनंतर तो लगेच हाताने भांग मोडून टाकतो. म्हणजे शाहरुखला चांगले-नीटनेटके-व्यवस्थित राहायला आवडत नाही का?

याचे उत्तर तो देतो की, ‘मला नाही आवडत. मी सामानाचा सगळा पसारा करून ठेवतो. वस्तू जागच्या जागी ठेवत नाही. ते तर माझे नशीब चांगले आहे की, माझे सहकारी सगळं सांभाळून घेतात. मी केलेला सगळा पसारा आवरतात. मी अर्ध नग्न वारताना मला सहन करतात.’

तो एवढ्यावरच थांबला नाही. शाहरुखला त्याच्या मुलाने घरात शर्ट न घालता वावरणे मुळीच आवडत नाही. तो सतत त्याला शर्ट घालण्यासाठी सांगत असतो. तो म्हणतो, ‘मी मुलगा-मुलगी भेद करीत नाही. माझ्या घरात जे नियम मुलींसाठी तेच मुलांसाठीसुद्धा आहेत. मी आर्यनला नेहमी सांगत असतो की, तु घरात आई, बहीण किंवा कोणत्याच महिलेसमोर शर्ट काढून यायचे नाही. कारण जर मुली असे शर्ट काढून फिरू शकत नसतील तर तुसुद्धा तसे करू शकत नाही.’

कसा विरोधाभास आहे बघा. शाहरुख स्वत: पँट काढून फिरतो मात्र मुलाने शर्टलेस राहण्यास त्याचा विरोध आहे.

Web Title: Shahrukh Khan's favorite pants to draw?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.