चाहत्याच्या वाढदिवशी शाहरुखचं खास गिफ्ट; अभिनेत्याच्या एअरपोर्टवरील त्या कृतीने जिंकली मनं, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 11:05 IST2024-02-14T11:04:33+5:302024-02-14T11:05:37+5:30

शाहरुख खानचा एअरपोर्टवरील तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय (shahrukh khan)

Shahrukh khan's action in front of everyone at the airport won hearts, the video went viral | चाहत्याच्या वाढदिवशी शाहरुखचं खास गिफ्ट; अभिनेत्याच्या एअरपोर्टवरील त्या कृतीने जिंकली मनं, पाहा व्हिडिओ

चाहत्याच्या वाढदिवशी शाहरुखचं खास गिफ्ट; अभिनेत्याच्या एअरपोर्टवरील त्या कृतीने जिंकली मनं, पाहा व्हिडिओ

शाहरुख खान (Shahrukh Khan) हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता. गेली अनेक वर्ष किंग खान प्रेक्षकांचं मन जिंकतोय. शाहरुखचे सिनेमे पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. शाहरुख त्याच्या चाहत्यांवर सातत्याने प्रेम दर्शवत असतो. असंच एक उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं. शाहरुख एअरपोर्टवर (Airport) जात असतानाच त्याला कळलं की त्याचे फोटो काढणाऱ्या एका पापाराझीचा वाढदिवस आहे. तेव्हा शाहरुखने केलेल्या कृतीने सर्वांचं मन जिंकलं.

शाहरुख खानचा व्हिडीओ विरल भयानीने शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी दिसून येतेय. एअरपोर्टवर शाहरुख चेकिंग करत होता. त्यावेळी त्याची मॅनेजर पूजाने शाहरुखला आठवण करुन दिली की, एका पापाराजीचा वाढदिवस आहे. शाहरुखला कळताच तो मागे वळला आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शाहरुखचा हात हातात घेऊन त्या पापाराझीने त्याला किस केलं. 

शाहरुखचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून प्रत्येकजण किंग खानच्या प्रेमळ स्वभावाचं कौतुक करत आहे. किंग खानने २०२३ मध्ये 'जवान', 'डंकी' आणि 'पठाण' हे तीन सुपरहिट सिनेमे दिसले. शाहरुखचे २०२४ मध्ये कोणतेही नवीन सिनेमे येणार नाहीत. शाहरुखने सध्या ब्रेक घेतला असून तो कुटुंबासोबत व्हकॅशन मोडमध्ये आहे.  शाहरुखचा 'डंकी' लवकरच ओटीटीवर रिलीज होईल.

Web Title: Shahrukh khan's action in front of everyone at the airport won hearts, the video went viral