अखेर ‘धूम4’साठी मिळाला व्हिलन! भाईजानच्या जागी किंगखानची वर्णी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 21:01 IST2018-08-17T20:55:55+5:302018-08-17T21:01:04+5:30

‘धूम4’साठी अखेर खलनायक मिळालाच. होय, सलमान खान आऊट होताच, निर्माता आदित्य चोप्राला ‘धूम4’मध्ये खलनायक साकारणारा हिरो मिळाला आहे.

shahrukh khan will be the new villian of dhoom4 replacing salman khan | अखेर ‘धूम4’साठी मिळाला व्हिलन! भाईजानच्या जागी किंगखानची वर्णी!!

अखेर ‘धूम4’साठी मिळाला व्हिलन! भाईजानच्या जागी किंगखानची वर्णी!!

‘धूम4’साठी अखेर खलनायक मिळालाच. होय, सलमान खान आऊट होताच, निर्माता आदित्य चोप्राला ‘धूम4’मध्ये खलनायक साकारणारा हिरो मिळाला आहे. हा हिरो कोण तर शाहरूख खान. होय, सुपरस्टार शाहरूख खान ‘धूम4’मध्ये व्हिलन साकारणार असल्याचे कळतेय.

करिअरच्या अगदी सुरूवातीला ‘डर’ आणि ‘बाजीगर’ या चित्रपटात शाहरूखने नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या. शाहरूखला सुपरस्टारचा दर्जा मिळवून देण्यात या दोन्ही चित्रपटांचा मोठा वाटा आहे. या चित्रपटानंतर शाहरूखने कधीच मागे वळून पाहिले नाही. पण आताश: शाहरूखचे करिअर एका नाजूक वळणावर येऊन ठेपले आहे आणि करिअरच्या या नाजूक वळणावर शाहरूखने पुन्हा एकदा व्हिलन बनण्याचा निर्णय घेतला आहे. गत पाच वर्षांत शाहरूखने एकही ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेला नाही. रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सस्प्रेस’नंतर शाहरूखच्या नावावर एकही चित्रपट खपला नाही. याऊलट सलमान खान आणि आमिर खान यांच्या चित्रपटांनी मात्र धूम केली. गत पाच वर्षांत फराह खान (हॅपी न्यू ईअर), रोहित शेट्टी (दिलवाले), मनीष शर्मा (फॅन), राहुल ढोलकिया (रईस) अशा दिग्दर्शकांवर डाव लावून शाहरूखवर पश्चातापाची वेळ आली आहे. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा आपला मर्जीतल्या काही दिग्दर्शकांकडे मोर्चा वळवला आहे. यात निर्माता व दिग्दर्शक आदित्य चोप्रा आणि संजय लीला भन्साळींचा समावेश आहे़ भन्साळींनी अद्याप शाहरूखसाठी काहीही प्लान केलेले नाही. पण आदित्यने मात्र शाहरूखला ‘धूम4’ दिला आहे. यात तो निगेटीव्ह भूमिका करताना दिसेल. आधी ही भूमिका सलमान करणार होता. पण ‘रेस3’ फ्लॉप झाल्यानंतर आदित्यने सलमानपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसाही सलमानला ‘धूम4’मधील नफ्यातील वाटा हवा होता. शाहरूखची मात्र अशी काहीही अट नसल्याने आदित्य सध्या खूश आहे. साहजिकचं शाहरूखही सुखावला आहेच.

 

Web Title: shahrukh khan will be the new villian of dhoom4 replacing salman khan