शाहरुखने महाराष्ट्रभूमीचे मानले आभार, जमिनीला स्पर्श करुन केला प्रणाम, सर्वांनी केलं किंग खानचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 11:02 IST2025-08-21T11:01:38+5:302025-08-21T11:02:49+5:30

शाहरुखने त्याच्या भाषणातून मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल आदर आणि प्रेम दर्शवला आहे. काय म्हणाला शाहरुख?

Shahrukh khan thanked Maharashtra mumbai bowed down to the ground video viral | शाहरुखने महाराष्ट्रभूमीचे मानले आभार, जमिनीला स्पर्श करुन केला प्रणाम, सर्वांनी केलं किंग खानचं कौतुक

शाहरुखने महाराष्ट्रभूमीचे मानले आभार, जमिनीला स्पर्श करुन केला प्रणाम, सर्वांनी केलं किंग खानचं कौतुक

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. शाहरुख नुकताच 'बार्ड्स ऑफ बॉलिवूड'च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात दिसला. या कार्यक्रमात शाहरुखने महाराष्ट्राबद्दल आपले विचार व्यक्त केले. त्याने महाराष्ट्राची भूमी आणि येथील लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अनेक आठवणींना उजाळा दिला. याशिवाय जसं प्रेम तुम्ही मला दिलं तसंच प्रेम आर्यनला सुद्धा द्या, अशा भावनिक शब्दात सर्वांना आवाहन केलं. काय म्हणाला शाहरुख? जाणून घ्या

शाहरुख खानने महाराष्ट्राबद्दल केलं प्रेम व्यक्त

शाहरुख खान म्हणाला, "मी मुंबई आणि महाराष्ट्रातील या पावन भूमीचा खूप आभारी आहे." असं म्हणताच शाहरुख जमिनीला स्पर्श करुन नमस्कार करतो. पुढे शाहरुख म्हणतो, "संपूर्ण भारत देशातील पावन भूमीचा मी आभारी आहे. या भूमीने मला गेली ३० वर्ष तुमचं मनोरंजन करण्याची संधी दिली. आज खूप खास दिवस आहे. कारण याच पावन भूमीवर माझा मुलगाही पहिलं पाऊल टाकतोय. खूप छान वाटतंय जसं प्रत्येक बापाला वाटतं."




"आर्यन खूप मेहनती आहे. कारण मी त्याला एक-दोन गोष्टीच सांगितल्या आहेत की, बॉक्स ऑफिसचे आकडे हे यशाची खात्री देत नाहीत. याशिवाय समीक्षकांनी लिहिलेले पॉझिटिव्ह रिव्ह्यूज याची काही खात्री नसते. इतक्या वर्षांमध्ये जे प्रेम तुम्ही मला दिलंंय त्याचं १५० टक्के प्रेम हे फक्त आर्यनला द्या.", अशाप्रकारे शाहरुखने आपल्या भाषणात महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल प्रेम आणि आदर दर्शवला. दरम्यान आर्यन खानने दिग्दर्शित केलेली 'बार्ड्स ऑफ बॉलिवूड' ही वेबसीरिज १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. सर्वांना या सीरिजची उत्सुकता आहे.

Web Title: Shahrukh khan thanked Maharashtra mumbai bowed down to the ground video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.