शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:44 IST2025-08-14T12:41:20+5:302025-08-14T12:44:06+5:30
शाहरुख खान २०२३ पासून स्क्रीनवरुन गायब आहे. २ वर्षांपासून त्याचा एकही सिनेमा रिलीज झालेला नाही

शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
शाहरुख खानचा (Shahrukh Khan) आगामी 'किंग' (King) सिनेमाचं शूट जोरात सुरु आहे. किंग खान गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाच्या शूटमध्ये व्यग्र आहे. यामुळे तो सोशल मीडियावरही जास्त अॅक्टिव्ह दिसलेला नाही. सिनेमात त्याची मुलगी सुहाना खानही दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी शूट करताना शाहरुख खान जखमी झाल्याची बातमी आली होती. तर आता 'किंग' पोस्टपोन झाल्याचीही चर्चा आहे. यामागे नक्की काय काय?
'किंग' सिनेमाची रिलीज पोस्टपोन
शाहरुख खान २०२३ पासून स्क्रीनवरुन गायब आहे. राज कुमार हिरानींच्या 'डंकी'मध्ये तो शेवटचा दिसला. २ वर्षांपासून त्याचा एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. अद्याप 'किंग' सिनेमाची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र त्याआधीच सिनेमाची रिलीज डेट बदलल्याचं समोर आलं आहे. मिड डे नुसार, 'किंग'च्या शूटमध्ये अनेक व्यत्यय आल्याने चित्रीकरणात दिरंगाई होत आहे. याचं कारण म्हणजे शाहरुख खान जखमी झाला आहे. नुकतंच त्याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. यानिमित्त त्याने आभार मानणारा व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाल्याचं दिसलं. यामुळेच किंग सिनेमाचं शूट संपायला काहीसा उशीर होईल असा दावा केला जात आहे. २०२७ पर्यंत सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे. याआधी ऑक्टोबर २०२६ मध्येच सिनेमा रिलीज होणार होता. मात्र अदायप यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
शाहरुखचा 'किंग'मल्टीस्टारर सिनेमा आहे. अभिषेक बच्चन, अभय वर्मा, सौरभ शुक्ला, सुहाना खान, जयदीप अहलावत याचीही भूमिका आहे. तसंच अर्शद वारसीही सिनेमात असल्याची चर्चा आहे. या सिनेमातून सुहाना खान पहिल्यांदाच वडिलांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.