CM शिंदेंच्या बाप्पानं शाहरुख-सलमानला एकत्र आणलं, सर्वांचंच लक्ष वेधलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 09:18 AM2023-09-25T09:18:25+5:302023-09-25T10:35:05+5:30

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणपतीसाठी अवतरलं बॉलिवूड

Shahrukh khan Salman khan were seen together at Chief Minister Eknath shinde s residence as Bollywood actors reached Bappa s darshan | CM शिंदेंच्या बाप्पानं शाहरुख-सलमानला एकत्र आणलं, सर्वांचंच लक्ष वेधलं!

CM शिंदेंच्या बाप्पानं शाहरुख-सलमानला एकत्र आणलं, सर्वांचंच लक्ष वेधलं!

googlenewsNext

सध्या १० दिवस गणेशोत्सवाचा उत्साहात साजरा होतोय. लोक घरोघरी जात बाप्पाचं दर्शन घेत आहेत. जल्लोषपूर्ण वातावरणात एकत्रित येत गणरायाची आरती केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) यांच्या निवासस्थानीही गणपतीची स्थापना झाली आहे. काल २४ सप्टेंबर रात्री बॉलिवूडचे आणि टीव्ही कलाकार मुख्यमंत्र्यांच्या घरी जमले. मुख्यमंत्र्यांनी सर्वांचंच उत्साहात स्वागत केलं. या सगळ्यात शाहरुख सलमान (Shahrukh Khan-Salman Khan) हे दोन्ही दिग्गज कलाकार एकत्र दिसले. दोघांनी मुख्यमंत्र्यांसोबत फोटोही काढला. एकनाथ शिंदेंच्या निवास्थानातील कालचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

शाहरुख सलमान जिथे एकत्र येतात तो  क्षण काही औरच असतो. काल थेट मुख्यमंत्र्यांसोबत या दोन्ही कलाकारांना पाहिलं तेव्हाचे व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत. दोघांनी आरतीही केली. दोघंही एकमेकांशी गळाभेट करताना आणि संवाद साधताना दिसले. मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी सलमानसोबत बहीण अर्पिता खान आणि तिचा नवरा आयुष शर्माही होता. याशिवाय बोनी कपूर, खुशी कपूर, आशा भोसले, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, एल्विश यादवसह अनेक कलाकारांची मांदियाळी होती. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात  आले आहेत.

शाहरुख सलमानच्या उपस्थितीने चाहते चांगलेच खूश झाले आहेत. 'यांच्यामुळेच बॉलिवूड जीवंत आहे','मेरे करण अर्जुन एक साथ','आजच्या जगात ही देशाला हीच एकता गरजेची आहे' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

Web Title: Shahrukh khan Salman khan were seen together at Chief Minister Eknath shinde s residence as Bollywood actors reached Bappa s darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.