सुहानाच्या बॉयफ्रेन्डबद्दल शाहरूखने केला खुलासा, वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 08:00 IST2019-10-30T08:00:00+5:302019-10-30T08:00:02+5:30

शाहरूख खानची मुलगी सुहाना खान  बॉलिवूड डेब्यू करणार, अशी ब-याच दिवसांपासून चर्चा आहे. सुहानाचा डेब्यू होईल तेव्हा होईल, पण सध्या सुहानाबद्दल एक फक्कड बातमी आहे.

shahrukh khan reveals he bought gift for suhana khan boyfriend | सुहानाच्या बॉयफ्रेन्डबद्दल शाहरूखने केला खुलासा, वाचून व्हाल थक्क

सुहानाच्या बॉयफ्रेन्डबद्दल शाहरूखने केला खुलासा, वाचून व्हाल थक्क

ठळक मुद्देसुहाना सध्या न्युयॉर्क युनिव्हर्सिटीत शिकतेय.

शाहरूख खानची मुलगी सुहाना खान  बॉलिवूड डेब्यू करणार, अशी ब-याच दिवसांपासून चर्चा आहे. सुहानाचा डेब्यू होईल तेव्हा होईल, पण सध्या सुहानाबद्दल एक फक्कड बातमी आहे. होय, बॉलिवूड डेब्यूआधीच तिच्या आयुष्यातील स्पेशल व्यक्तिची चर्चा होतेय. सुहानाचा बॉयफ्रेन्ड आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण सुहानाचा डॅड म्हणजे खुद्द शाहरूख लेकीच्या बॉयफ्रेन्डसाठी गिफ्ट खरेदी करून देतो.
डेव्हिड लेटरमॅनला दिलेल्या मुलाखतीत खुद्द शाहरूखने हा खुलासा केला. खरे तर सुहानाच्या बॉयफ्रेन्डसाठी हे सगळे करणे शाहरूखला अजिबात आवडत नाही. पण तरीही अपरिहार्यपणे त्याला काही गोष्टी कराव्या लागतात.

याबद्दल त्याने सांगितले की, मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवण्यावर माझा भर असतो. त्यांना काही अडचणी असल्यास त्या सोडवण्यास माझे प्राधान्य असते. अर्थात त्यांच्या गर्लफ्रेन्ड, बॉयफ्रेन्डच्या अडचणी सोडवण्यात मला अजिबात रस नाही. 


सुहानाच्या बॉयफ्रेन्डबद्दल सांगताना तो म्हणाला की, सुहानाच्या आयुष्यात कुठलाही पुरूष असलेला मी सहन करू शकत नाही. तिने त्या मुलाला सोडावे, अशी माझी इच्छा आहे. त्याला पळवून लाव, तो काहीही कामाचा नाही, असे मी तिला वारंवार सांगतो. पण तरीही सुहानाच्या बॉयफ्रेन्डसाठी मला गिफ्ट खरेदी करावे लागतात.

सुहाना सध्या न्युयॉर्क युनिव्हर्सिटीत शिकतेय. सुहाना व तिच्या मित्रांचे फोटो अनेकदा व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी सुहानाच्या शॉर्ट फिल्मचा टीजर लॉन्च झाला होता. ‘द ग्रे पार्ट आॅफ द ब्ल्यू’ या शॉर्ट फिल्ममध्ये सुहाना लीड रोलमध्ये आहे.

Web Title: shahrukh khan reveals he bought gift for suhana khan boyfriend