शाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 19:43 IST2019-01-23T19:39:04+5:302019-01-23T19:43:48+5:30

शाहरुख खानचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'झिरो' सिनेमा बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झाला. या अपयशातून बाहेर पडण्यासाठी शाहरुखने आपल्या आगामी सिनेमाच्या तयारीला लागला आहे.

Shahrukh khan next film don the final chapter priyanka chopra would not be in new actress makers searching | शाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु

शाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु

ठळक मुद्दे शाहरुखने 'डॉन: द फायनल चॅप्टर'ची तयारी सुरु केली आहेफरहान अख्तरच्या सिनेमात शाहरुख खान पुन्हा एकदा डॉनची भूमिका साकारणार आहे

शाहरुख खानचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'झिरो' सिनेमा बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झाला. या अपयशातून बाहेर पडण्यासाठी शाहरुखने आपल्या आगामी सिनेमाच्या तयारीला लागला आहे. शाहरुखने 'डॉन: द फायनल चॅप्टर'ची तयारी सुरु केली आहे. आता या सिनेमाशी संबंधीत नवी माहिती समोर येते आहे. 

फरहान अख्तरच्या सिनेमात शाहरुख खान पुन्हा एकदा डॉनची भूमिका साकारणार आहे. फर्स्टपोस्टच्या रिपोर्टनुसार या सिनेमाच्या स्क्रिप्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. सध्या सिनेमा प्री-प्रोडक्शनचे काम सुरु आहे. लवकरच हा सिनेमा फ्लोअरवर येणार आहे. याआधीच्या डॉनमध्ये शाहरुख खानसोबत प्रियांका चोप्रा दिसली होती मात्र या सिरीजमध्ये प्रियांकाचा पत्ता कट करण्यात आला आहे.   


प्रियांकाच्या जागी नव्या अभिनेत्रीच्या शोधात मेकर्स आहेत जी शाहरुखच्या अपोझिट दिसेल. रिपोर्टनुसार मेकर्सनी अजून कोणत्याही अभिनेत्री नाव फायनल केलेले नाही. याशिवाय शाहरुखचा सारे जहां से अच्छा सिनेमात दिसणार आहे. यासिनेमात फरहान अख्तरची मुख्य भूमिका आहे. रिपोर्टनुसार यात फरहान पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करणार आहे. 


काही दिवसांपूर्वीच शाहरुखने चंद्रावर जमीन खरेदी केल्याची माहिती लुना सोसायटी इंटरनँशनलचे संचालक मायकेल रिकी यांनी पत्राव्दारे कळविली आहे.  

Web Title: Shahrukh khan next film don the final chapter priyanka chopra would not be in new actress makers searching