"मै अच्छा हूँ, बुरा हूँ, मै कौन..." किंग खानने ऐकवला जवानचा डायलॉग, चाहत्यांनी केला एकच आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 11:24 IST2023-10-04T11:23:17+5:302023-10-04T11:24:49+5:30

'जवान'च्या एका स्पेशल इव्हेंटला शाहरुखने सिनेमातील लोकप्रिय 'मै कौन हूँ' हा डायलॉग ऐकवला.

shahrukh khan live performs famous dialogue from jawan main kaun hoon audience makes noise | "मै अच्छा हूँ, बुरा हूँ, मै कौन..." किंग खानने ऐकवला जवानचा डायलॉग, चाहत्यांनी केला एकच आवाज

"मै अच्छा हूँ, बुरा हूँ, मै कौन..." किंग खानने ऐकवला जवानचा डायलॉग, चाहत्यांनी केला एकच आवाज

शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या 'जवान' (Jawan) ला मिळालेलं यश एन्जॉय करतोय. 'पठाण' नंतर त्याने 'जवान' ब्लॉकबस्टर हिट देत आपणच बॉलिवूडचा किंग असल्याचं सिद्ध केलंय. शिवाय त्याचा 'डंकी' हा आगामी सिनेमाही याचवर्षी प्रदर्शित होतोय. नुकतंच शाहरुखने 'जवान' संबंधित एका पत्रकार परिषदेत हजेरी लावली. यावेळी त्याने 'जवान'मधील 'मै कौन हूँ' हा डायलॉग ऐकवत सर्वांनाच सरप्राईज केलं . त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मुंबईत आयोजित 'जवान'च्या एका स्पेशल इव्हेंटला शाहरुख खानने त्याच्या खास अंदाजात सिनेमातील लोकप्रिय 'मै कौन हूँ' हा डायलॉग ऐकवला. यावेळी तिथे असणाऱ्या सर्वांनीच त्याला शिट्ट्या वाजवत दाद दिली. व्हिडिओमध्ये शाहरुख माईक हातात घेताना दिसतो आणि आपल्या स्टाईलमध्ये म्हणतो,'मै कौन हूँ, कौन नही पता नही. माँ को किया वादा हूँ, या अधुरा एक इरादा हूँ, मै अच्छा हूँ, बुरा हूँ..सही बोल रहा हूँ ना...पुण्य हूँ...पाप हूँ...ये खुद से पूँछना, क्यूँ की मै भी...(हसतो).! 

अशा प्रकारे शाहरुख डायलॉगचा शेवटचा शब्द हसतच न बोलता सोडून देतो. तेव्हा चाहते जोरजोरात आवाज करत त्याला दाद देतात. ग्रे टीशर्ट, जॅकेट आणि ब्लॅक ट्राऊझर्समध्ये शाहरुख नेहमीप्रमाणेच हँडसम दिसत आहे. 

अॅटली दिग्दर्शित 'जवान'ने बॉक्सऑफिसवर तुफान कमाई केली आहे. आतापर्यंत सिनेमाने 612 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर सिनेमाचं वर्ल्डवाईड कलेक्शन 1068 कोटी इतकं झालं आहे. सिनेमात साऊथ ब्युटी नयनतारा, प्रियमणि, दीपिका पदुकोण, विजय सेतुपति यांचीही भूमिका आहे. शाहरुखचा यामध्ये डबल रोल असून त्याच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं आहे. तर आता डिसेंबरमध्ये शाहरुखचा 'डंकी' रिलीज होणार आहे.

Web Title: shahrukh khan live performs famous dialogue from jawan main kaun hoon audience makes noise