भारत-पाक तणावात शाहरुख खानचा मोठा निर्णय, ड्रीम प्रोजेक्टवर होणार परिणाम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 19:28 IST2025-05-12T19:28:18+5:302025-05-12T19:28:28+5:30
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा बॉलिवूडवरही परिणाम दिसू लागला आहे.

भारत-पाक तणावात शाहरुख खानचा मोठा निर्णय, ड्रीम प्रोजेक्टवर होणार परिणाम?
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'किंग' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. २०२४ मध्ये शाहरुख खानचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही, त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या सिनेमात शाहरुख हा त्याची लाडकी लेक सुहानासोबत दिसणार आहे. अशातच आता या सिनेमाबद्दल एक अपडेट समोर आलं आहे. या सिनेमाचं शुटिंग सध्या पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं जात आहे.
शाहरुख खान आणि सुहाना खान यांच्या 'किंग' चित्रपटाचं शुटिंग हे १६ मे २०२५ पासून सुरू होऊ शकतं, असं म्हटलं जातं होतं. पण, ई टाईम्सनुसार 'किंग'चं शूटिंग शेड्यूल पुढे ढकलण्यात आले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला तणाव हा आहे. देशामधील तणावाचे वातावरण लक्षात घेता, शाहरुख खान याने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जर चित्रपटाचं शुटींग उशीरा सुरु झालं तर चित्रपट रिलीजलाही उशीर होऊ शकतो असं म्हटलं जातं आहे.
यामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे अभिनेता अनिल कपूरदेखील 'किंग'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे समजते. तब्बल ३० वर्षांनंतर शाहरुख आणि अनिल कपूर एकत्र एका पूर्ण चित्रपटात दिसणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. याआधी शाहरुख आणि अनिल १९९५ मध्ये आलेल्या 'त्रिमूर्ती' चित्रपटात एकत्र दिसले होते. याशिवाय 'ओम शांती ओम', 'द झोया फॅक्टर' आणि 'टोटल धमाल'मध्ये त्यांचे म्युच्युअल कॅमिओ दिसले आहेत. अनिल कपूर शिवाय या सिनेमात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत आहे. तसेच अर्शद वारसी, अभय वर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. शाहरुख खानचा हा बहुचर्चित चित्रपट पुढील वर्षी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.