'या' कारणामुळे Shahrukh Khan ने आजपर्यंत काश्मीर पाहिले नाही, स्वतः केला खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 05:24 PM2023-10-05T17:24:45+5:302023-10-05T17:26:36+5:30

ShahRukh Khan In KBC: शाहरुख खानने जगभर प्रवास केला आहे, पण आजपर्यंत काश्मीर पाहिले नाही.

shahrukh-khan-in-kbc-says-he-never-visited-kashmir-till-now | 'या' कारणामुळे Shahrukh Khan ने आजपर्यंत काश्मीर पाहिले नाही, स्वतः केला खुलासा...

'या' कारणामुळे Shahrukh Khan ने आजपर्यंत काश्मीर पाहिले नाही, स्वतः केला खुलासा...

googlenewsNext

Shah Rukh Khan In KBC: हे वर्ष शाहरुख खानसाठी खूप लकी ठरलं आहे. आधी 'पठान' आणि आता 'जवान' चित्रपटामुळे शाहरुख चर्चेत आहे. शाहरुख गेल्या 35 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये असून, त्याने आतापर्यंत सुमारे 100 चित्रपटांमध्ये काम केले आहे. शुटिंगच्या निमित्ताने शाहरुख भारतासह जगभरातील अनेक ठिकाणी फिरला आहे. पण, शाहरुखने आजपर्यंत काश्मीरला भेट दिलेली नाही.

काश्मीरला भारताचा स्वर्ग म्हणतात. येथे दरवर्षी हजारो लोक फिरायला जातात. मात्र बॉलिवूडच्या बादशाहने आजपर्यंत या भूमीवर पाऊल ठेवलेला नाही. याचा खुलासा खुद्द किंग खानने केला आहे. शाहरुखने 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावरुन काश्मीरला कधीही न गेल्याचा खुलासा केला, तसेच याचे कारणही सांगितले होते.

जगभर फिरलो पण काश्मीरला गेलो नाही
शाहरुख म्हणतो, 'माझ्या वडिलांची आई काश्मिरी होती. तिने मला आयुष्यात एकदातरी तीन ठिकाणे पाहण्यास सांगितले होते. तिने मला, इस्तंबूल, इटली आणि काश्मीर पाहण्यास सांगितले होते. परंतु माझ्याशिवाय काश्मीर पाहू नको असे तिने सांगितले. पण, तिचा खूप लवकर मृत्यू झाला. याच कारणामुळे मी जगभर फिरलो, पण काश्मीरला गेलो नाही. 

किंग खान पुढे म्हणाला, मला काश्मीरला जाण्याच्या अनेक संधी मिळाल्या, मित्रांनी बोलावले, कुटुंबातील सदस्य सुट्टीवर गेले. पण मी कधीच काश्मीरला गेलो नाही. माझ्या वडलांनीही, माझ्याशिवाय काश्मीर पाहू नको, मी तुम्हाला दाखवतो, असे म्हटले होते. पण, त्यांचाही लवकर मृत्यू झाला. त्यामुळेच मी आजपर्यंत काश्मीरला पाहायला गेलो नाही.

Web Title: shahrukh-khan-in-kbc-says-he-never-visited-kashmir-till-now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.