​शाहरुख खानने दिली दिलीप कुमार यांना भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 11:15 IST2017-08-16T05:45:01+5:302017-08-16T11:15:01+5:30

दिलीप कुमार यांची तब्येत गेल्या कित्येक दिवसांपासून बिघडली होती. त्यांच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने त्यांना आयसीयुमध्ये ठेवण्यात आले होते. ...

Shahrukh Khan gave Dilip Kumar a gift | ​शाहरुख खानने दिली दिलीप कुमार यांना भेट

​शाहरुख खानने दिली दिलीप कुमार यांना भेट

लीप कुमार यांची तब्येत गेल्या कित्येक दिवसांपासून बिघडली होती. त्यांच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने त्यांना आयसीयुमध्ये ठेवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा असल्याने त्यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची तब्येत आता सुधारत देखील असल्याचे त्यांची पत्नी सायरा बानू यांनी मिडियाला सांगितले आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शाहरुख खान नुकताच त्यांच्या घरी गेला होता. 
शाहरुख खान आणि दिलीप कुमार यांचे खूपच जवळचे नाते आहे. दिलीप कुमार शाहरुख खानला आपला मुलगा मानतात. सायरा बानूनेच दिलीप कुमार आणि शाहरुख खान यांचे फोटो दिलीप कुमार यांच्या ट्विटर या सोशल मीडिया साईटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दिलीप कुमार खूपच अशक्त दिसत आहेत. शाहरुखला त्यांना भेटून झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. सायरा बानू यांनी या फोटोला खूप छानशी कॅप्शन देखील दिली आहेत. दिलीप साहाब घरी परतल्यापासून त्यांची तब्येत चांगलीच सुधारली आहे. त्यांचा मानलेला मुलगा शाहरुख खानने नुकतीच त्यांना घरी येऊन भेट दिली. त्याच्यातील काही फोटो मी शेअर केले आहेत. 
सायरा बानू यांनी शेअर केलेल्या एका फोटोत शाहरुख दिलीप कुमार यांना प्रेमाने कपाळावर चुंबन देताना दिसत आहे. 

dilip kumar with shahrukh khan
शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासूनच त्याच्या अभिनयाची तुलना दिलीप कुमार यांच्या अभिनयाशी केली जाते. पण ते महान कलाकार असून त्यांच्याशी माझी तुलना करणे चुकीचे असल्याचे अनेकवेळा शाहरुखने त्याच्या मुलाखतींमध्ये सांगितले आहे. 

Also Read : Don’t worry fans! ! दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर!

Web Title: Shahrukh Khan gave Dilip Kumar a gift